लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,गडचांदूर येथील एम सी व्ही सी विभागाच्या वतीने शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत वरोरा येथील आनंद निकेतन कृषि महाविद्यालय,तसेच चंद्रपूर येथील ए पी जे अब्दुल कलाम गार्डन ला 17 डिसेंबर ला शैक्षणिक भेट दिली.
आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे एनिमल हजबंडरी अँड डेअरी सायन्स विभागाचे प्रमुख डॉ मुकुंद पटोड यांनी गाय, म्हैस चे विविध प्रकार सांगून दुग्धजन्य पदार्थ बनविणे,कुक्कुटपालन व्यवस्थापन याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली,डॉ विजय पाटील यांनी हवामान वेधशाळा बाबतीत माहिती दिली, डॉ राम महाजन यांनी सेंद्रिय शेती, गांडूळ खत निर्मिती बाबत माहिती दिली, डॉ नितीन गजबे यांनी जैविक खतांची ओळख करून दिली, त्याचे विविध प्रकार,व महत्त्व सांगितले,
प्राचार्या स्मिताताई चिताडे, उपप्राचार्य विजय आकनूरवर,एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेलेल्या या शैक्षणिक सहलीमध्ये प्रा,आरजू आगलावे,प्रा रोशन मेश्राम, प्रा राजू खाडे, व विद्यार्थी सहभागी झाले होते,
,