लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 21 डिसेंबर 2022द्रोणागिरी भूषण पुरस्कार हा मानाचा, प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे उरण बोकडविरा येथे आयोजित केलेल्या जिल्हा स्तरीय युवा महोत्सव मध्ये शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले सोनाली धीरज बुंदे ह्यांना “द्रोणागिरी भूषण पुरस्कार 2022” ने सन्मानीत करण्यात आले. यावेळी मालिनी सोनवणे,माजी आमदार मनोहरसेठ भाईर, द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत,अनिलजी मालुसरे (सूर्याजी मालुसरे ह्यांचे वंशज ),धिरज बुंदे, मिलिंद खारपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सोनाली धीरज बुंदे(शिक्षण-BA Psycology, MA, MBA, BSL)यांनी लिटिल हार्ट्स प्री स्कूल ची स्थापना 2010 मध्ये अकोला विदर्भ येथे केली व उरण तालुक्यातील कुंभारवाडा स्वामी नारायण मंदिर जवळ येथे 2018 साली स्थापना केली.स्व.रामदासजी दगडुजी बुंदे शिक्षण संथा उरण रायगड स्थापन करून गोर गरिबांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले .स्व. रामदासजी दगडुजी बुंदे NGO ची स्थापना केली. तळागाळातील लोकांना सहारा दिला.
द्रोणागिरी काउन्सलिंग सेंटरची स्थापना करून लोकांना मानसिक आरोग्य बद्दल जागृत केले .अनेक स्कूल कॉलेज मध्ये जाऊन विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले.अनेक शिबीरात हजेरी लावली.स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना सोनाली बुंदे निशुल्क मार्गदर्शन करतात. MPSC /UPSC विद्यार्थ्यांना ते मिशन IAS च्या माध्यमातून मदत करतात.त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेउन त्यांना द्रोणागिरी पुरस्कार मिळाला आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.