लोकदर्शन 👉 मोहन भारती
गडचांदूर सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे थोर गणितितज्ञ श्रीनिवास रामानुज यांचा जन्मदिवस दिनांक 22 डिसेंबर ला राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांनी श्रीनिवास रामानुज व संस्थेचे संस्थापक सचिव स्वर्गीय हरिभाऊ डोहे गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पामाला अर्पण करून अभिवादन केले ,तसेच गणित विषयाचे महत्त्व तथा रामानुज यांच्या कार्याची माहिती सांगितली . कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून पर्यवेक्षक संजय गाडगे, माधुरी उमरे, यांनीही सखोल मार्गदर्शन केले.
शाळेत गणितीय चार्ट व प्रतिकृती यांची प्रदर्शन भरविण्यात आली त्या प्रदर्शनीचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे,सुरेश पाटील नामदेव बावनकर, राजेश मांढरे ,जीवन आडे, आत्राम सर, मेश्राम सर,डिम्पल मॅडम,चटप मॅडम, शेंडे मॅडम इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भुवनेश्वरी गोपमवार धर्मपुरीवार मॅडम यांनी, तर आभार भालचंद्र कोगंरे सर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शशिकांत चन्ने ,शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
्