लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा( :– लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती व अन्य भागात सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांची व्यथा नागपूर येथे सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनात मांडल्या. २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार असल्याचे एकूण आदिवासी बहुल, अतिदुर्गम अशा भागातील शाळेचे शिक्षक, पालक चिंतातूर आहेत. तेव्हा अशा शाळा बंद होणार आहेत का याबाबत शासनाची नेमकी भूमिका काय आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच राजुरा येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे उर्दू माध्यम व मराठी माध्यम शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत ते भरणार का असा प्रश्न उपस्थित केला यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी सांगितले की राज्य सरकार राज्यातील कोणत्याही शाळा बंद करणार नसून शाळा बंद करण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. एकही शाळा बंद होऊ देणार नाही तसेच ज्या शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत तिथे लवकरच शिक्षक उपलब्ध करून दिल्या जातील असे आश्वासन दिले आहे.