By : Ajay Gayakwad
वाशीम :
मालेगाव : ग्रामपंचायत निवडणुक निकालानंतर अमानी गावात विनापरवाना विजयी मिरवणूक काढून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी नवनिर्वाचित सरपंच सह गावातील 40 जनावर गुन्हा दाखल करून मिरवणुकीत वापरलेले स्पीकर व वाहन ताब्यात घेतले. मालेगाव पोलिसांनी ही कारवाई दिनांक 21 डिसेंबर रोजी केली
याबाबतची फिर्याद पोलीस शिपाई समाधान वाघ यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली. यामध्ये नमूद केले की 20 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कोणत्याही विजयी उमेदवारांना गावात विजयी मिरवणूक तसेच कोणाच्या भावना दुखवतील अशी घोषणाबाजी, गुलाल उधळणे, फटाके, आतिषबाजी करणे याला मनाई करण्यात आली होती. मात्र अमानी येथील नवनिर्वाचित सरपंच सदस्य व काही नागरिकांनी विजयी मिरवणूक काढून आदेशाचा भंग केला यावरून मालेगाव पोलिसांनी नवनिर्वाचित सरपंच अनिल दत्तात्रय जाधव शिवराम किसन शिंगणे गणेश गोमाजी भोरकाडे गजानन महादेव ठाकरे देविदास मारुती झळके भीमराव नामदेव इंगळे चंद्रशेखर चंदू माने सुभाष विठ्ठल गवळी त्यागराज संजय गवळी गणेश रमेशराव हरणे भानुदास किशन गवळी अमोल भानुदास गवळी सचिन लक्ष्मण गवळी राजेश प्रकाश तायडे पंढरी जनार्दन गवळी शिवा रामदास गवळी कचरू किसन माने विकास बळीराम गवळी मदन संपत गवळी ,राम तेजराव गवळी, नारायण अंकुश मोकासे, सतीश पांडुरंग नालटे मुरलीधर महादेव खंडारे नारायण अर्जुन झळके भागवत दशरथ खिल्लारे ओम भारत गवळी शेषराव मारुती ठाकरे विजय चंदू माने नितीन दत्तात्रेय जाधव व अधिक दहा ते बारा लोक यांच्याविरुद्ध मालेगाव पोलीस स्टेशनला कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून या विजय मिरवणुकीमधील स्पीकर बॉक्स असलेले वाहन सुद्धा ताब्यात घेऊन मालेगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आले.