जैन बांधवांकडून मालेगांवात बंदची हाक : झारखंड सरकारच्या निर्णयाचा केला विरोध

 

By : Ajay Gayakwad

वाशिम

मालेगांव : – झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे या विरोधात संपूर्ण जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली आहे या भारत बंदला मालेगांव जैन समाज बांधवांनी पाठींबा दिला असून आज सर्व जैन बांधव आपले दुकान,व्यवसाय बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध नोंदवीला असल्याचे समस्त जैन समाजांनी आवाहन केले आहे झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे या तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा अनेक दिवसांपासून विरोध आहे पर्यटन स्थळे आणि वन्यजीव अभयारण्य यासारख्या गोष्टी करण्यासाठी सरकारने जारी केलेली अधिसूचना धार्मिक श्रद्धा दुखावणारी आहे कोणताही सुसंस्कृत समाज अशा योजना स्वीकारणार नाही सरकारने सम्मेत शिखरजीसह देशातील सर्व धार्मिक स्थळे पवित्र स्थळे म्हणून घोषित करून तेथे दारू,मांसाहार व इतर व्यसनांवर बंदी घालावी पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे चुकीचे असून सम्मेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा प्रस्ताव मागे घ्यावा अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल असा इशारा जैन समस्त समाजाने दिला आहे
केद्र सरकार व झारखंड सरकाच्या निर्णयाचा मालेगांव येथे सकल जैन समाजाच्या वतिने तिव्र जाहिर निषेध केला आहे यावेळी तहसीलदारांना निवेदन दिले आहे निवेदनात असे नमूद केले आहे की झारखंड राज्यातील गीरीडोह जिल्हातील तिर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे जैन धर्मीयांचे महत्वाचे व पवित्र असे तिर्थक्षेत्र असून या तिर्थक्षेत्राला झारखंडच्या राज्य सरकारने तसेच केंद्रातील वन पर्यटन व पर्यावरण विभागाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे त्यामुळे देशातील समस्त जैन समाज बांधवा तर्फे तिव्र निषेध केला जात आहे त्यानुसार मालेगांव येथील समस्त सकल जैन समाज बांधवा तर्फे आप-आपली प्रतिष्ठाण बंद ठेवून शासनाचा निषेध केला आहे तरि आपण आमचे म्हणणे केंद्र सरकार पर्यत पोहचवावे हि विनंती ही या निवेदनात केली आहे
प्रमुख मागणी : – पर्यटन स्थाळाचा दर्जा कमी करून जैन तिर्थक्षेत्राचा दर्जा प्रदान करावा जैन समाजाच्या भावना केंद्र व झारखंड सरकार पर्यत पोहचवाव्या अशी आग्रहाची मागणी या निवेदनामार्फत केली आहे.
समस्त जैन बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत समस्त सकल जैन समाज मालेगांव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here