जिल्हा परिषद केंद्रस्तरीय अध्यक्ष चषक स्पर्धेत माणिकखांब शाळेचे घवघवीत यश

लोकदर्शन 👉 राहुल खरात

खंबाळे येथे घोटी केंद्राच्या नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत जवळपास 16 शाळांनी सहभाग नोंदवला होता. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणिकखांब या शाळेने नेत्रदीपक कामगिरी करत स्पर्धेत दणदणीत विजय मिळवला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा आयोजित केली जाते. या वर्षी पार पडलेल्या स्पर्धेत विविध प्रकाराच्या सर्व क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत या शाळेने 19 बक्षिसे मिळवत घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे.
अंतिम निकाल
मोठा गट
वक्तृत्व स्पर्धा
रोहिणी पांडुरंग चव्हाण,प्रथम क्रमांक.
लहान गट
स्वरा विजय चव्हाण ,द्वितीय क्रमांक
चित्रकला स्पर्धा
मोठा गट
धनश्री नथु माळी,प्रथम क्रमांक
लहान गट
ऋषिकेश शिवाजी भटाटे,द्वितीय क्रमांक
वैयक्तिक नृत्य
लहान गट
पूर्वा काळू भटाटे
द्वितीय क्रमांक.
इंग्रजी स्पेलिंग बी स्पर्धा
लहान गट
पूर्वी काळू भटाटे,तृतीय क्रमांक
बुद्धिबळ स्पर्धा
दर्शन एकनाथ चव्हाण,प्रथम क्रमांक
मोठा गट 200 मी धावणे मुली
त्रिवेणी गुरुनाथ चव्हाण,द्वितीय क्रमांक
लहान गट 100 मीटर धावणे मुली
दक्षणा गणपत चव्हाण
द्वितीय क्रमांक
मोठा गट 400 मी धावणे मुले
गोपी बाळू भोईर,
द्वितीय क्रमांक
लहान गट 200 मी धावणे मुले
दुगेश योगेश चव्हाण द्वितीय क्रमांक
समुह स्पर्धा
खो खो मुले
द्वितीय क्रमांक
खो खो मुली
प्रथम क्रमांक
कबड्डी मुले
द्वितिय क्रमांक
कबड्डी मुली
द्वितीय क्रमांक
समूह नृत्य स्पर्धा
मोठागट
पथम क्रमांक
समुहनृत्य लहानगट
द्वितीय क्रमांक
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी निलेशजी पाटील,विस्तार अधिकारी राजेंद्र नेरे,केंद्रप्रमुख व शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर,अनिल बागुल,ग्रामपंचायत सरपंच शामभाऊ चव्हाण,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा मनसे नेते भोलानाथ चव्हाण,माजी पंचायत समिती सभापती विष्णूभाऊ चव्हाण,माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण ,शिवसेना नेते भारतभाऊ भटाटे,ग्रामसेवक सोनवणे,सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,प्रमुख पदाधिकारी ,माध्यमिक शाळा स्टाफ यांनी अभिनंदन केले.
विजयी स्पर्धकांना वर्गशिक्षक अशोक कुमावत,दिगंबर बागड,प्रतिभा पाटील,दामोदर बच्छाव ,तसेच मुख्याध्यापक राजेंद्र मोरकर ,शिक्षक संजय देवरे,इंदिरा दंडगव्हाळ, सरला देवरे,संगीता पवार,संगीता अहिरे,संगीता हिरे,पुंजाराम हिरे ,रेखा देवरे आदींचे मार्गदर्शन लाभले.विजयी स्पर्धकांचे घोटी परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील यशासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *