By : Shankar Tadas
कोरपना :
कोरपना तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल आज 20 डिसेंबर रोजी घोषित झाले. त्यात शेतकरी संघटना – भाजपा युतीने बाजी मारली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रथमच सरपंचपद प्राप्त झाले तर काँगेसला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
तालुक्यातील बाखर्डी, अंतरगाव बु., वीरूर गाडेगाव, निमनी, कुकुडसाथ, माथा, यरगव्हाण, जेवरा, कोळसी बु., कवटाळा येथील सरपंच व सदस्य पदाची निवडणूक पार पडली.
बाखर्डी येथे सरपंचपदी संघटनेचे अरुण रागीट, अंतरगाव येथे संघटनेच्या नीता वाघमारे, माथा येथे संघटना- भाजपाच्या मंजुषा देवाळकर, विरूर गाडेगाव येथे भाजपाच्या तेजस्विना मनोहर झाडे, कवठाळा येथे महाविकास आघाडीच्या रुपाली बोबडे, कुंकूडसाथ येथे भाजपा- संघटना युतीचे शंकर आत्राम, जेवरामध्ये भाजपाचे नैनेश आत्राम, कोडशी बु. येथे संघटना-भाजपाचे उमेश कोल्हे, येरगव्हाण येथे काँग्रेसच्या प्रेमीला किन्नाके, निमणी येथे भाजपा- संघटनेचे अतुल धोटे सरपंच पदी विजयी झाले आहेत. येरगाव्हण, गांधीनगर, निमणी येथे काही सदस्य यापूर्वीच अविरोध निवडून आले होते. यापूर्वी 26 ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्यात काँग्रेसवर होती. या निवडणुकीत मात्र त्यांना निराशा पदरी पडली आहे.