लोकदर्शन 👉प्रतीक्षा इंगळे
*ऐतिहासिक प्राचीन विरासत नागलोक चैत्य ५० एकर पुरातत्व इतिहास भुमी इसासणी हिंगणा जिल्हा नागपुर येथे १२ व्या जबरदस्त इतिहास नागलोक परिषद च्या वतीने ग्रामीण युवा संघटनेचे विदर्भध्यक्ष मा. नरेंद्र नवनीत इंगळे यांच्या सामाजिक क्षेत्रात असलेली उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन मा.नरेंद्र नवनीत इंगळे यांना “राष्ट्रिय बहुजन मित्र पुरस्कार” देण्यात आला आहे.
नरेंद्र इंगळे यांना लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे व त्यानी गेल्या काही वर्षांपासून सामाजिक, आरोग्य,शैक्षनिक,व बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे काम ग्रामीण युवा संघटनेच्या माध्यमातून केले आहे आपल्या देशावर आलेल्या कोरोणा महाभयंकर बिमारी मध्ये सुध्दा नरेंद्र इंगळे रुग्णांची सेवा केली आहे त्यामधे गोरगरिब जनतेला राशन असो वा काही आर्थिक मदत असो दवाखान्यात सुद्धा मदत करत राहता यामध्ये दर ३ मध्ये अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरे,रोजगार मेळावे, आरोग्य शिबिरे आयोजित करत असतात त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा होतो.बुद्धिस्ट मॉरीज ब्युरो गेल्या चार वर्षा पासून चालवत आहेत दोनसे पेक्षा जास्त लग्न जुडवले.
नरेंद्र नवनीत इंगळे यांनी हे सर्व काम करत तरुणपिढीसाठी एक आदर्श ठेवला आहे.नरेंद्र इंगळे चे हे सर्व कार्य पाहून या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे