By : Shankar Tadas
कोरपना :
*अंबुजा सिमेंट फाउंडेशनच्या प्रयत्नाचे फलित*
जिल्हा क्रीडा संकुल मार्फत २०२१ -२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावर्षी प्रथमच अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या सौजन्याने ७ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला सहभागी होता आले. त्या शाळांची ऑनलाईन पद्धतीने नोंद करून खेळाडूंना तालुकास्तरीय स्पर्धासाठी जिल्हा परिषद शाळेच्या सहकार्याने अंबुजा सिमेंट फाउंडेशनने मुलाचा सराव करून घेतला. याच सरावाचा उपयोग म्हणजे नांदाफाटा येथे आयोजित १४ वर्षीय अंतिम सामन्यामध्ये मुलांच्या गटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांनी १ गुणानी विजय पटकवला, तर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयेगाव यांनी मुलीच्या अंतिम सामन्यामध्ये १० गुणांनी विजय मिळविला.
जिल्हास्तरावर होणाऱ्या १४ वर्षीय मुला व मुलीच्या होणाऱ्या सामन्यामध्ये कोरपणा तालुक्याने नेतृत्व केले. त्याचबरोबर तालुका स्तरावर खेळविल्या जाणाऱ्या मैदानी स्पर्धामध्ये सुदधा जिल्हा परिषद शाळांनी उत्कृष्ट यश पटकावले.
यामध्ये राजुरा तालुक्यातून १०० मीटर मुलीच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद शाळा मंगी ची शुभांगी राठोड प्रथम आली, तर कोरपना तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा थुटराची पावनी मोदकुलवार प्रथम आली. ४०० मीटर १४ वर्ष आतील मुलांच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये कोरपना तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा कवठाळाचा अंकुश सोनवणे प्रथम आला, तर मुलीच्या गटातून जिल्हा परिषद शाळा, भोयेगाव ची अंशिका ठाकरे प्रथम आली. जिल्हा परिषद शाळा कवठाळा येथून द्वितीय क्रमांक राधा वरारकर आणि तिसरा क्रमांक निकिता दुधाळकर हिने पठकिवला.
२०० मीटर धावण्याच्या १४ वर्ष आतील मुलीच्या स्पर्धेत राजुरा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा मंगीची शुभांगी राठोड प्रथम आली. ४०० मीटर रिले स्पर्धामध्ये जिल्हा परिषद शाळा मंगीने १४ वर्ष आतील मुलाच्या व मुलीचा गटातून प्रथम क्रमाक पठकिविला.
कोरपना क्रीडा संकुल अंतर्गत खेळविल्या गेलेल्या १४ वर्ष आतील मुलाचा खो- खो स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद शाळा लखमापूर यांनी तालुक्यातून प्रथम क्रमांक पठकीवला. जिल्हा स्तरावर खेळविला गेलेला सामन्यामध्ये जिल्हा परिषद शाळा थूठरा १४ वर्ष आतील मुलाच्या कबड्डी सामन्यात भद्रावती संघाला अवघ्या ४ गुणांनी हरली, तर १४ वर्ष मुलीच्या कबड्डी सामन्यात जिल्हा परिषद शाळा भोयेगाव संघास १० गुणांनी नागभीड संघाविरुद्ध हार पत्कारावी लागली. १४ वर्ष मुलच्या खो खो स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद शाळा लखमापूर यांनी ६ गुणांनी सामना गमविला.
जिल्हा स्तरावर मुलांची हार झाली असली तरी अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही यांच्या सहकार्याने कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे आणि सरोज अंबागडे यांच्या प्रयत्नातून प्रथमच जिल्हा परिषद शाळेची मुले तालुका व जिल्हास्तरीय खेळू शकले, याचा आनंद आहे असे मनोगत सर्व सहभागी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व क्रडा शिक्षक यांनी व्यक्त केले.
पुढील सत्रामध्ये नव्या जोमाने प्रयत्न करून विभागीय स्तरावरत सहभागी होण्यासाठी शुभेच्छा गट शिक्षण अधिकारी मनोज गोरकार (पंचायत समिती राजुरा) , गट शिक्षण अधिकारी रुपेश कांबळे (पंचायत समिती कोरपना) यांनी दिल्या आहे.
*****
लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर
9850232854