लोकदर्शन मुंबई 👉योगेश खेमकर या नावाने
प्लाझा सिनेमा मागील (बाया पार्क) समाधान (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, दादर (प.) मुंबई- २८, या ठिकाणी माजी अधिकारी
श्री. विलास खर्चे मुंबई महापालिका, झो.पु.प्रा. (विकासक, मे. रेर्नसन्स कन्स्ट्रक्शन) श्री. विलास खर्चे यांनी सदर मालमत्ते मध्ये महापालिकेचे ५० करोड रुपयांचे अतिरिक्त विकास क्षेत्र व ५० करोड रुपयांची ३८ प्रकल्प ग्रस्त सदनिका गिळकृत केले. तसेच सदर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात माजी अधिकारी पदाचा दुरुपयोग करुन झो. पु. प्रा. शासकीय व मुंबई महानगरपालिका अधिकारी वर्गाने श्री. विलास खर्चे हा माजी अधिकारी असल्याने व विकासक झाल्यामुळे १०० करोडच्या आर्थिक फायदयाकरीता मोठ्या प्रमाणात अनियमीतता केल्याबाबत लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न नगरविकास मंत्री व गृहनिर्माण मंत्री यांना केला होता. परंतु गृहनिर्माण मंत्री यांना सदरचा प्रश्न वर्ग करण्यात आले त्यानुसार दिशाभुल करणारा अहवाल प्रशासनास पाठविले. परंतु नगरविकास मंत्री यांना सदर प्रश्न पाठिवले नाही. नगर विकास विभागाने तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यात येण्याबाबत मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री नगरविकास महाराष्ट्र राज्य व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री गृहनिर्माण
महाराष्ट्र राज्य यांना योगेश खेमकर यांनी तक्रार केली होती. सदर योजनेत अनाधिकृत मलनिसारण जोडणी जल जोडणी व इतर परवानगी देण्याकरीता मदत करणाऱ्या अधिकारी वर्गाची पुर्ण विभागीय
प्रशासकीय चौकशी मा.डॉ. संजय मुखर्जी अतिरिक्त आयुक्त बृ.मु.न.पा. यांच्या आदेशावरुन अभियंता / प्रमुख दक्षता अधिकारी यांनी दक्षता विभागाकडुन प्रशासकीय कार्रवाई व अंतीम आदेश प्राप्त करुन संबंधीत अधिकारी वर्गावर बृ.मु.म.पा. नियमानुसार कार्रवाई व अतिरिक्त आयुक्त यांच्या आदेशानुसार ए ते डी परवानग्या रद्द करण्यासाठी उपप्रमुख चौकशी परिमंडळ – २ यांनी सहाय्यक महापालिका आयुक्त जी / उ विभाग यांच्याकडे कार्रवाई करीता पाठविले होते, परंतु सदर विकासकावर वरील आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. सदर योजनेतील संयुक्तीक इमारतीच्या पुर्ण परिसर याला नगर रचना विभागाने नोयोजीत केलेल्या रस्त्याचे नियोजन आजपर्यंत क्रा.सिंह नाना पाटील भाजी मंडईच्या अस्तित्वामुळे उपलब्ध होऊ शकत नाही. सदर ईमारतीच्या चौहु बाजुने अग्निशमन वाहन / वाहन जाऊ शकत नाही, म्हणुन माजी प्रमुख अग्निशमन अधिकारी श्री. परब यांनी नाहरकरत प्रमाणपत्र रद्द केले, सदर खुलासा माजी प्रमुख अग्निशामक अधिकारी श्री. रहंदाळे यांनी दिलेल्या अहवालातुन दिसून येते तरी वास्तुविशारदाचा प्रस्ताव स्पष्टीकरण प्राप्त झाले नसतांना वास्तुविशारदाची चर्चेनुसार अग्निशामक विभागाचे मा.श्री. परब प्रमुख अग्निशामक अधिकारी यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन अंतिम ना हरकत प्रमाणपत्र देऊन झो.पु.प्रा. कार्यालयात उपलब्ध केले, त्यामुळे विकासकास झो. पु. प्रा. कार्यालयातुन ईमारतीला भोगोवटा प्रमाणपत्र (ओ.सी.) झो.पु. प्रा. अधिकारी देण्यात आले. सदर योजनेमध्ये महापालिकेचा पदपथ अनाधिकृत पणे गिळकृत केल्याबद्दल अंतिम आदेश ने मुंबई महापालिकेचे श्री. शरद उघडे, सहाय्यक महापालिका आयुक्त जी / उ विभाग याने काढले, तरीसुध्दा सदर २०० फुट क्षेत्र मोकळे क्षेत्र न सोडता त्याचे तिनपट क्षेत्रफळ एल.ओ.आय. मध्ये विकासकास प्राप्त करु दिले गेले आहे. आपल्या पदाचा दुरुपयोग करुन झो.पु. प्रा. विभागाला व भुमापक व भूमि अभिलेख मुंबई यांना सदर पदपथ अनाधिकृत पणे विकासकाने गिळंकृत केल्याबाबत अंतिम आदेशाबाबत कळवले नाही. त्यामुळे भुमापक व भुमिअभिलेख मुंबई यांनी पुनःश्च मोजमाप/भुमापन करुन झो.पु. प्रा. विभागाने अद्यावत एल. ओ. आय. घेतला नाही. म्हणुन विकासकास झो. पु. प्रा. कार्यालयातुन सदर योजनेतील विक्री इमारतीला भोगोवटा प्रमाणपत्र (ओ.सी.) देण्यापुर्वी ५० कोटी मुल्याचे प्रकल्प ग्रस्त सदनिका व महापालिकेचे ५० करोड रुपयाचे अतिरिक्त स्थालातरीत विकास क्षेत्राचे महसुल हे देण्यास लागु नये. (सदर बाब मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभाग, यांनी झो.पु. प्रा. यांना वारंवार कळवली देखील आहे.) तसेच विकासकांच्या प्रकल्पाला विलंब होऊ न देता विकासकास आर्थिक फायदा मिळवून दिला. म्हणुन भूमापक व भूमि अभिलेख मुंबई यांनी सदर बाब जाणुन बुजून दुर्लक्षीत करुन विकासकास अतिरिक्त क्षेत्रफळ प्राप्त करण्यास मदत केली हे सिध्द होते, त्यामुळे विकासक विलास खर्चे हा मुंबई महापालिकेचा माजी अधिकारी असल्यामुळे त्याच्या पुर्वीपार अधिकाऱ्यांशी साठीगाठीमधून गैरव्यवहार होत असल्यामुळे झो.पु. प्रा. व मुंबई महापालिकेमध्ये १०० कोटी रुपयांचा घोटाळा करण्यास विकासक यशस्वी झाला.
तक्रारदार
योगेश सुभाष खेमकर,
समाधान वाडी, सुभाष खेमकर मार्ग,
प्लाझा सिनेमा मागे दादर पश्चिम
मुंबई 28
मोबाईल नंबर – 9594705655