लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना – ग्रामीण भागात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने विविध महाविद्यालयांचे शिबीर पार पडतात. देशाच्या उज्वल भविष्यासाठी अशा शिबिरांच्या माध्यमातून युवा नेतृत्व विकसीत व्हावे असे प्रतिपादन आमदार सुभाष धोटे यांनी केले.
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून युवा नेतृत्व विशेष शिबीर आयोजन लखमापूर येथे करण्यात आले आहे. दिनांक १५ ते १७ डिसेंबर ला विठ्ठल रुक्माई देवस्थान सभागृह लखमापूर तह कोरपना येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
शिबिराचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक तथा संचालक डॉ. अनिल चिताडे यांच्या हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे, प्र. सचिव धनंजय गोरे, सरपंच अरुण जुमनाके, उपसरपंच संभाजी टेकाम, संचालक विठ्ठल थीपे, विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, दानशूर महिला गिरजाबाई मडावी, अंबुजा सिमेंट फाउंडेशनचे जितेंद्र बैस, माजी उपसभापती मनोहर नैताम, प्राचार्या स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रदीप परसुटकर, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ विद्यालय गडचंदूरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले. प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य स्मिता चिताडे यांनी केले.