लोकदर्शन 👉 मोहन भारती
जिवती (ता.प्र.) लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी पंचायत समिती सभागृह जिवती येथे महसूल, अन्नपुरवठा, विद्युत, कृषी, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन जिवती तालुक्यात विविध विभागा अंतर्गत सुरू असलेले विकासकामे तसेच विभागा अंतर्गत भेडसावणाऱ्या समस्या याची माहिती घेऊन तालुक्यातील विविध विकासकामांना गती प्रदान करणे, समस्या मार्गी लावणे, जनतेच्या प्रश्नावर उपाययोजना करणे यासंदर्भात आढावा बैठकीत सविस्तर चर्चा केली. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी इच्छाशक्तीने आणि तन्मयतेने काम करण्यास सर्व विभागाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
या प्रसंगी प्रभारी तहसीलदार चिडे, गटविकास अधिकारी डॉ. भागवत रेजिवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, उपनगराध्यक्ष डॉ अंकुश गोतावळे, माजी उपनगराध्यक्ष अशफाक शेख, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे, उपविभागीय पुरवठा निरिक्षक सोनी गंभीरे, उपविभागीय अभियंता व्ही. ए. पोफले, उपविभागीय विद्युत अभियंता एन व्ही डोखणे, तालुका कृषी अधिकारी गोडबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी लंगडे, विस्तार अधिकारी राजेंद्र बांबोडे, सुनील शेदकी, समीर पठण, ताजुद्दी शेख, कुभेझरी लहू गोतावळे, भीमराव कोडापे, सरपंच जंगु कोटनाके यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरीक उपस्थित होते.