लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे
उरण दि १२.डिसेंबर 2022उरण तालुक्यातील जसखार ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार धूमधडाक्यात सुरु असून, युवा संकल्प पॅनलने जबरदस्त आघाडी घेतली आहे.”युवा सामाजिक संघटना “ह्या तरुणांच्या पक्षविरहित संघटनेने “युवा संकल्प पॅनल ह्या नावाने निवडणूक लढविण्याचा दृढ संकल्प केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेकांचे हाडवैरी असलेले “उद्धव ठाकरे शिवसेना “आणि भाजप हे चक्क ह्या निवडणुकीत युती करून युवा सामाजिक संघटनेविरुद्ध एकत्र आले आहेत हे ह्या दोन्ही पक्षांचा नैतिक पराभव झाल्याचे निदर्शक आहे. तसेच तरुणांच्या ह्या एकट्या संघटनेविरुद्ध गावातील सर्व धनदांडगे पुढारी आणि पक्ष युती करून लढत आहेत.तरी देखील गावातील बहुसंख्य जनतेचा “युवा सामाजिक संघटनेला वाढता पाठिंबा मिळत असून त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणानले आहेत. उत्स्फूर्तपणे गावातील तरुणाई आणि सुशिक्षित, समंजस नागरिक युवा संकल्प पॅनलला पाठिंबा देत आहेत. सर्वपक्षीय आघाडी प्रचारात मात्र पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे. “युवा संकल्प पॅनलचे सर्व अकरा सदस्य आणि सरपंच बहुमताने निवडून येतील असा ग्रामस्थांचा सार्थ विश्वास आहे.
संपुर्ण उरण तालुक्यात युवा सामाजिक संस्था आणि जसखार च्या तरुणाई ने घेतलेल्या धाडसी निर्णया चे सर्वोतपरी अभिनंदन होत आहे आणि संपूर्ण गावो गावी अशा सामाजिक संघटना तयार व्हाव्या व या पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या राजकारणी लोकांना धडा शिकवावा अशी चर्चा उरण तालुक्यात सुरू आहे.
मागील २०१७ ग्रामपंचायत निवडणुकी मध्ये शेवा ग्रामपंचायत मध्ये जे परिवर्तन झाले त्याच प्रकारे जसखार गावात परिवर्तन होण्याचे चिन्ह निवडणुकी च्या प्रचारा च्या रणधुमाळी मध्ये स्पष्ट होत आहे.