लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर /जिवती :– जिवती तालुक्यातील वनखंडात समाविष्ट नसलेले एकूण 11 गावांचे 5659.854 हे. आर. विवादीत क्षेत्र व निर्वणीकरण झालेले 2989.955 हे. आर क्षेत्र असे एकूण 8649.809 हे.आर. विवादीत क्षेत्र वनविभागाचे अभिलेखाप्रमाणे वनक्षेत्र नाही. परंतु डाटा एन्ट्री चुकीच्या पध्दतीने झाल्यामुळे, शासन पत्र दिनांक 09.06.2015 अन्वये सदरहू 8649.809 हे आर. क्षेत्र हे वनक्षेत्र गृहीत धरण्यात आलेले आहे. वनकक्षात समाविष्ट नसलेले क्षेत्र विवादीत क्षेत्रातून वगळण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तातडीने सादर करावा अश्या सूचना राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी आयोजित केलेल्या दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजीच्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी वनविभागाच्या अधिकार्यांना सूचना दिल्या आहेत.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्य दक्ष आमदार सुभाष धोटे क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच धडपड करीत असतात मग तो जिवती तालुक्यातील सीमावर्ती भागातील १४ गावांचा प्रश्न असो वा जमिनीच्या पट्याचा यासाठी मंत्रालय स्तरावर विविध विभागाच्या बैठकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची प्रश्न सोडवीत आहेत. जिवती तालुक्यातील वन जमिनीचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने जिवती येथील ६६४ घरकुलाची व वन पट्यांची कामे प्रलंबित आहेत. याबाबत दिनांक ९ डिसेंबर २०२२ रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या समवेत वन विभाग अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली बैठकीला आमदार सुभाष धोटे, जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा अधीक्षक भुमिअभिलेक अधिकारी प्रमोद घाडगे, उपविभागीय अधिकारी राजुरा संपत खलाटे, मध्य चांद वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्ष श्रीकांत पवार, तहसीलदार जिवती प्रवीण चिडे, नायब तहसीलदार सचिन पाटील, जिवतीचे तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावडे, रामदास रणवीर, अस्पाक शेख, भोजी पाटील आत्राम, छगन साळवे, उपस्थित होते.