लोकदर्शन 👉 मोहन भारती
धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य ची राज्यस्तरीय आढावा सभा व चिंतन मंथन बैठक रविवार दिनांक 11/ 12/ 2012 रोजी पुण्यश्लोक अहील्या देवी होळकर समाज मंदिर, रेल्वे गेटचा बाजूला, धनगर नगर, शेगाव, ज़िल्हा बुलढाणा. येथे मा. अनिलकुमार ढोले राज्याध्यक्ष यांच्या अध्यक्ष ते खाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीला राज्य उपाध्यक्ष विलासजी डाखोळे सर,राज्य महासचिव शरद उरकुडे सर,राज्य कोषाध्यक्ष उज्वल रोकडे सर , राज्य कार्यकारणी सदस्य नाना भाऊ पांडे , श्री राजेंद्र बुधे सर हे उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक व विषय निहाय चर्चा शरद उरकुडे सर महासचिव आणि संघटनेची भूमिका विलास डाखोळे सर उपाध्यक्ष यांनी मांडली. तसेच अध्यक्षीय भाषणातुन राज्याध्यक्ष अनिलकुमार ढोले साहेब यांनी संघटनेची वाटचाल व पुढे करावयाचे कामकाज बाबत मार्गदर्शन केले होते.
सभेत प्रा गायकवाड सर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा, श्री प्रवीण लांडे सर जिल्हा अध्यक्ष अमरावती, एम जी बोरकर सर कार्याध्यक्ष वाशीम, डॉ करेवार साहेब कार्याध्यक्ष गडचिरोली, हेमंत ढोले साहेब कार्याध्यक्ष चंद्रपूर, काळमेघ सर वरुड , यशवंत कातरे सर कार्याध्यक्ष नागपूर, श्री भदे सर जिल्हा अध्यक्ष अकोला, कसरे सर यवतमाळ, यांनी आपल्या जिल्ह्यातील माहिती सादर केली. सभेत संघटना वाढीसाठी चे प्रयत्न, धनगर आरक्षण वरील अतिक्रमण, मेंढपाळ मोर्चा व पुढील वर्षी चे नियोजन इत्यादी विषयावर पदाधिकारी यांनी आपली भूमिका मांडली. सभेत उपस्थित बुलढाणा,वाशीम अकोला,अमरावती,चंद्रपूर,
गडचिरोली, नागपूर येथील जिल्हाध्यक्ष,कार्याध्यक्ष,सचिव,
कोषाध्यक्ष ,जिल्हा समन्वयक व इतर जिल्हा पदाधिकारी हजर होते.
सभेमध्ये खालील विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली
1)सर्व जिल्ह्यातील धनगर अधिकारी कर्मचारी संघटना यांच्या सर्व सभासदांची यादी सादर करणे.
2) आपल्या जिल्ह्यातील जमा झालेल्या सर्व निधीचा जमाखर्च सादर करणे.
3) पासबुकप्रमाणे नोंदी याविषयीची माहिती देणे. सर्वांनी पासबुक अपडेट करून आणणे.
4) सभासद वाढीकरीता करावे लागणारे प्रयत्न यावर चर्चा.
5 )अधिसंख्य विषयावर चर्चा.*
6) बिगर धनगर उदाहरणार्थ झाडे,कानडे यांचे भजक आरक्षणावर अतिक्रमण या विषयावर सविस्तर चर्चा.
7) कर्मचारी व समाजाचे असलेल्या समस्यावर योग्य असे निराकरण करण्याकरिता चिंतन मंथन.*
8) दुसऱ्या वार्षिक अधिवेशन चे दिनांक व ठिकाण बाबत चर्चा*
9) पुढील वर्षी वार्षिक वर्षपूर्ती चा कार्यक्रम, महिला दिनाच्या कार्यक्रम व विषय, दिनदर्शिका , स्मरणिका तयार करणे. वरील सर्व विषयावर सभेत चर्चा करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. निलेश पुंड सर यांनी केले, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष समाधान गायकवाड सर यांनी केले होते.