लोकदर्शन आटपाडी ;👉 राहुल खरात
विधान परिषद सदस्य आमदार . गोपिचंदजी पडळकर यांना आटपाडी तालुका उमेद अभियानातील सर्व केडर संघटनेच्या वतीने निवेदन दिले त्या मध्ये सी आर पी यांना शासनाने दिलेल्या कामा प्रमाणे मानधन फारच कमी आहे त्यामुळे सर्व केडरचे मानधन रोजगार हमी कायद्या अंतर्गत किमान वेतन द्यावे तसेच जिल्हा बाहय कर्मचार्याना त्यांच्या जिल्ह्यामध्ये बदलीकरून त्यांना काम करण्याची संधी द्यावी रिक्त जागा त्वरीत भरून कर्मचार्यांवर असलेला अतिरिक्त भार कमी करावा
अशा विविध मागण्यांचे निवेदन देणेत आले त्यावेळी कासार मॅडम , यमगर मॅडम , मेटकरी मॅडम तसेच करगणी गणाच्या माळी मॅडम मेनकुदळे मॅडम व तालुक्यातील सर्व सी आर पी व बँक सखी मोठ्या संख्याने उपस्थीत होत्या .
आमदार साहेबानी निवेदन स्विकारून घेतले व आपल्या सर्व मागण्या येणाऱ्या हिवाळी आधिवेशनात प्रश्न उपस्थीत करून आपल्या सर्व केडरच्या मागण्या मंजुर करणे संदर्भात आश्वासन दिले आहे .