लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– ग्राम पंचायत हा पंचायत राज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. तात्कालीन केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. यातून ग्रामीण बेरोजगारांना रोजगार उपलब्ध झाले. आज ग्रामीण भागातील अस्वच्छता, रोगराई आणि बेरोजगारी असे विविध प्रश्न बघता या योजनेतून गाव स्वच्छतेसाठी मजूर लावणे त्यांचे मजुरीवर खर्च करणे यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने आज मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन महाराष्ट्राचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरी विभागात नगर पंचायत, नगर परिषद मध्ये सार्वजनीक सभागृह व रस्ते स्वच्छ करण्याकरीता सफाई कामगार लावता येते तशी ग्राम पंचायतला कुठलिही व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायत स्वच्छ व सुंदर करण्याकरीता अडचण निर्माण होते म्हणुन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत आवश्यकतेनुसार दोन चार मजुर लावण्याची व त्यांच्या मजुरीवर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला तर गावही स्वच्छ, सुंदर बनेल. बरेच गाव निर्मल ग्राम पुरस्कार देवून निर्मल केले. परंतू निर्मल झाल्यानंतर ग्रामपंचायतकडे कुठलीही अशी व्यवस्था नसल्यामुळे यात सातत्य ठेवता आले नाहीत. त्यामुळे आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करून ही व्यवस्था करावी अशी मागणी केली आहे.
या प्रसंगी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंतराव पाटील, अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विदर्भ अध्यक्ष देवा पाचभाई, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, चंद्रपूर अध्यक्ष राजेंद्र कराळे, खाबाळाचे उपसरपच मंगेश धाडसे, पानवडाडाचे सरपंच संतोष तुराणकर, मांगलीचे सरपंच धनराज पायघन यासह महाराष्ट्रातील अनेक सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.