लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
नागपूर,
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सातव्या व आठव्या वर्गात शिकणाऱ्या दिपाली व अंजली राठोड यांचे गच्चीवरील सेंद्रीय परसबाग या विषयावर मनिष नगर, नागपूर येथे समग्रक्रांतीचे आधुनिक काळातील क्रांतीसूर्य वसंतराव नाईक यांच्या नावाने साकारलेल्या परसबागेची दखल जागतिक पातळीवरील कृषि शास्त्रज्ञ डॉ. सि.डी. मायी यांनी प्रत्यक्ष परसबागेला भेट देवून घेतली. राठोड परिवाराने करित असलेल्या जीवनावश्यक,उपयोगी आणि नित्य गरजेच्या प्रयोगाची पाहणी केली. दिपाली व अंजली राठोड यांचे सादरीकरण समजून घेतले व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या कल्याणकारी संकल्पनेतील मागील तेरा वर्षापासून यशस्वीपणे सुरु असलेल्या मध्य भारतातील सर्वात मोठ्या कृषि प्रदर्शनात प्रथमच अतिशय कमी वयातील सातव्या व आठव्या वर्गात शिकणाऱ्यां मुलींसह त्यांचे श्रीपत राठोड सह अपूर्व संधी अॅग्रो व्हिजन संचालक मंडळांनी दिली.हिंदी भाषेच्या माध्यमातून रासायनिक शेतीचे होणारे गंभीर दुष्परिणाम शेतजमीन,पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी भयंकर घातक होत असून आरोग्यावरील खर्च प्रचंड मोठया प्रमाणात वाढत चालला असून अनेक बिमाऱ्यांची संख्याही वेगाने वाढत असल्याचे विचार कार्यशाळेतून मांडण्यात आले.पूर्वी शंभरी गाठणाऱ्या मानवांचे आरोग्यही प्रचंड वेगाने घटत चालले असून भारतातील लोकांचे सरासरी आयुष्यमान 64 वर्षावर येवून ठेपले आहे. ही अतिशय गंभीर असल्याचे आवर्जून मांडण्यात आले. राठोड परिवाराने नागपूर सारख्या सिमेंटच्या जंगलात तेही इमारतीच्या थेट चौथ्या मजल्यावरील आरोग्यदायी जैविक प्रॉडक्टद्वारा उत्पादित पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे भाजीपाला,फळे,फुले,वनौषधी त्याचप्रमाणे उपयोगी रानभाज्या निर्माण केल्याचे अनुभवसिद्ध सादरीकरण प्रभावी व परिणामकारक ठरले हे विशेष. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीपत राठोड यांनी केले. सुत्रसंचलन कृषि महाविद्यालय नागपूरचे डॉ. रामकृष्ण घोडपागे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रामुख्याने डॉ. अजयसिंग राजपूत, कृषिऋषि राजेंद्र भट,ठाणे, मध्यप्रदेशचे शैलेंद्र सिंग व यवतमाळचे सामाजिक कार्यकर्ते सुनिल भेलेसह अनेक प्रमुख मान्यवर शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅग्रो व्हिजन टिमचे विषेश योगदान लाभले. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सर्वांचा सत्कार करण्यात आला.