लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,
कोरपना
,,,,,,,,,,,,,,,
परसोडा फाटा येथील मे. बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी मुकुटबन यांच्या विरोधातील चक्का जाम आंदोलन मध्यस्थी नंतर तूर्तास मागे घेण्यात आले आहेत, मा तहसिलदार कोरपना यांचे प्रतिनिधी मा. भगत नायब तहसीलदार कोरपना व मा ठाणेदार सदाशिवराव ढाकणे पोलीस स्टेशन कोरपना यांच्या मार्फत मा जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.
मे. बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी मुकुटबन यांनी खालील मागण्या आठ दिवसाच्या आत शेतकऱ्या सोबत वाटा घाटी करून मागण्या मान्य करण्याचे आश्वान देण्यात आल्याने तूर्तास चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले आहेत,
परसोडा, कोठोडा खू ,कोठोडा बू रायपूर व गोविंदपूर येथील शेत जमिनीवर व शासकीय जमिनी वर उत्खन करण्या करिता परवानगी मागितली आहे. परंतु दिनांक 30/11/2022 ला ग्राम सभा बोलावण्यात आली व प्रकल्प ग्रस्त शेतकरी यांनी एक मतांनी ग्राम सभे मध्ये पुढील प्रमाणे ठराव संमत करण्यात आले,
1) ग्राम पंचायत परसोडा यांनी दिनांक 14/02/2020 ला घेण्यात आलेल्या परवानगी रद्द करण्यात यावी. कारण परवानगी देतांना प्रती एकर 25 लक्ष रुपये एक सात बारा एक नौकरी बाधित गावांना मूलभूत सुविधा सरसकट शेतकऱ्या सोबत वाटा घाटी करून संवाद साधून जमिनी खरेदी करण्यात यावी. अश्या शर्ती टाकून परवानगी देण्यात आली होती परंतु तसे न करता मध्येस्थी मार्फत शेत खरेदी करण्यात येत आहे.तसेच सर्वे नंबर 124/2 मध्ये जमीन उत्खननाचे सुरू करण्यात आले आहे. याचाच अर्थ शर्ती व अटीचा भंग केल्यामुळे दिनांक 14/02/2020 परवानगी चा ठराव रद्द करण्यात यावा.
2) बाधित क्षेत्रातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.
3) सध्या सर्वे नंबर 124/2 शेतामध्ये उत्खलणाचे काम सुरू आहे. शेतकऱ्या सोबत वाटा घाटी होत नाही तोपर्यंत काम बंद करण्यात यावे.
4) बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिमेंट कंपनी च्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना कंपनी मार्फत हक्का चा सेस देण्यात यावा.
5) आजचे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भाव प्रती एकर दहा लक्ष रुपये ते बारा लक्ष रुपये दर सुरू आहे. त्यांच्या चार पट 40लक्ष रुपये ते 50लक्ष रुपये प्रति एकर देण्यात यावा.
असा ठराव संमत करण्यात आला असून .
मा जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना. मा तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत चक्का जाम आंदोलन स्थळी निवेदन देण्यात आले.
मा जिल्हाधिकारी चंद्रपूर व मे बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी यांनी शेतकऱ्या सोबत आठ दिवसाच्या आत वाटा घाटी करून संवाद साधून मार्ग कळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. आठ दिवसाच्या आत वाटा घाटी करून मागण्या पूर्ण न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन सादर करण्यात आले.
परसोडा ,रायपूर ,कोठोडा खू, कोठोडा बू ,गोविंदपूर येथील 150 पेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.असे तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम पेचे यांनी केले,