लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 10 डिसेंबर वॉरियर ड्रीम सिरीज आणि इंडियन मुए थाई ऑर्गनायझेशन चॅम्पियनशिप बहुउद्देशीय हॉल जेएनपीटी वसाहतगृह , उरण येथे आयोजित करण्यात आली होती. सकाळी 9.30 वाजता बहुउद्देशीय सभागृह जेएनपीटी वसाहतगृह येथे दीप प्रज्वलन करून तसेच रिंगणात हार आणि श्रीफळ फोडून सुरू झाली. सदर स्पर्धेचे उदघाटन प्रदीप ठाकूर (उप तालुका प्रमुख उरण शिवसेना, कराटे 3 रे डॅन ब्लॅक बेल्ट. इंटरनॅशनल), रवींद्र पाटील ( ट्रस्टी जेएनपीए कामगार युनियन जेएनपीटी), अड़वोकेट किशोर ठाकूर, संदीप घरत , कुणाल घरत (म्युच्युअल फंड सल्लागार) यांच्या हस्ते झाला. उदघाटन समयी आपल्या भाषणात ट्रस्टी रविंद्र पाटील आणि प्रदीप ठाकूर यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत 110 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात आसाम, कोलकाता, मध्यप्रदेश, चेन्नई इत्यादी राज्यातून अनेक संघ सहभागी झाले होते.आसाम संघाला 4 सुवर्णपदक आणि महाराष्ट्राला 25 सुवर्णपदक आणि नवी मुंबई व रायगड संघाने एकूण 14 सुवर्णपदके मिळवली.विजेत्यांना प्रदीप ठाकूर, संदीप घरत, किशोर ठाकूर, कुणाल घरत तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मेडल्स आणि पारितोषिके देण्यात आली. आयोजक
केतन प्रल्हाद घरत (भारतीय मुए थाई ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष),संजीवन पडवळ (नवी मुंबई मिक्स मार्शल आर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष),आणि टीम फिट अँड फाईट क्लब यांनी ते यशस्वीरित्या पार पाडले. तसेच तेजनक्षा रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाच्या मदतीने एम.एस. रेणुका पी (COO), डॉ.अश्विनी कोकरे (आरएमओ),मनाली कडू (लॅब टेक्निशियन), प्रांजली कोळी (स्टाफ नर्स), अमर बनसोडे (विपणन व्यवस्थापक),शुभंजी (हाउसकीपिंग) आणि जेएनपीटी टाऊनशिप हॉस्पिटल यांच्या वतीने सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडला.