लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 10 डिसेंबर 2022शिक्षण क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील जुनियर कॉलेज दहागाव विभाग जासई, ता. उरण जि. रायगड या शैक्षणिक संकुलात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते त्यांनी या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करून आरोग्य मय जीवनाचे महत्त्व आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले मान्यवर डॉक्टर आणि प्रमुख पाहुणे यांचे स्वागत करून या शिबिरात आरोग्य सेवा दिल्याबद्दल सर्व डॉक्टर टीम विषयी कृतज्ञता व्यक्त केली. संकल्प सेवा समिती व वाय. एम. टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुलींसाठी कळी उमलताना या विषयावर आणि त्यांच्या माता पालकांसाठी या शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रणाली दांडेकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच वाय. एम. टी. आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, नवी मुंबईचे डीन डॉ.निनाद साठे यांनीही आरोग्य विषयी अमूल्य माहिती पालक व विद्यार्थ्यांना दिली. या शिबिरामध्ये विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावी अखेर च्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी कामगार नेते मधुकर पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभली होती.विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस, पर्यवेक्षिका म्हात्रे एस.सी रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख आणि विद्यालयातील सर्व सेवकांनी हे शिबिर यशस्वी करण्यामध्ये सहभाग घेतला.