लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– पंचायत राज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषद राजुरा च्यावतीने ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य यांची आढावा बैठक पंचायत समितीच्या बी. आर. सी. सभागृह, राजुरा येथे पार पडली. या प्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय सरपंच परिषद चे विदर्भ अध्यक्ष एड. देवा पाचभाई, विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई, जिल्हाध्यक्ष राजेंद्र देवराव कराडे, आदिवासी नेते तथा ग्रामपंचायत सदस्य बाबुरावजी मडावी, जिल्हा सचिव रत्नाकर चटप, तालुकाध्यक्ष राकेश हिंगाणे, महिला तालुकाध्यक्षा रिता हनुमंते यांची उपस्थिती होती. या प्रसंगी मार्गदर्शन करताना एड. देवा पाचभाई यांनी ग्रामपंचायत विकासासाठी सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य यांच्या पाठीमागे अखिल भारतीय सरपंच परिषद भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले. तर नंदकिशोर वाढई यांनी सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा सहभाग गाव विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. सगळ्यांना विश्वासात घेऊन गाव विकासासाठी शासनाचा नक्षलग्रस्त निधी, तांडा वस्ती निधी, मनरेगाचा निधी, 15 वित्त आयोगाचा निधी, पंचायत समिती 15 वित्त आयोग निधी, जिल्हा परिषद चा 15 वित्त आयोग निधी, जनसुविधा निधी, उद्योगांकडून मिळणारा सीएसआर निधी या सगळ्यांचा पाठपुरावा करून गाव विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे यासाठी सर्वांना आम्ही सहकार्य करू असे सांगितले. राजेंद्र कराडे यांनी सरपंचांना सर्व प्रशासकीय, शासकीय योजनेची माहिती असणे फार गरजेची आहे. यासाठी अखिल भारतीय सरपंच संघटनेने पूर्ण महाराष्ट्रभर काही मेळावे आयोजित करित आहे असे सांगितले.
या प्रसंगी कडोलीचे राकेश हिंगाणे, धीडशी चे रीता हनुमंते, आर्वी चे शालूताई लांडे, धोपटाळा चे मैनाबाई नन्नवरे, रामपूरचे वंदना गौरकर, मुठरा चे करिष्मा बोबडे, टेंभुरवाही चे रामकृष्ण मळावी, मारडा चे मनोहर डेरकर, अहेरी चे भारत शेडमाके, मंगी चे शंकर तोळासे, तीन गुडा ईसापुर चे शुभांगी आत्राम, पवनी चे पांडुरंग पोटे, वरोडा चे वनमाला कातकर, शिरशी चे मंदा किनाके, साखरी चे प्रणाली मडावी, मानोली चे अनुसया उदे, इत्यादी सरपंच, सर्व उपसरपंच, ग्रा प सदस्य आणि असंख्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक राकेश हिंगाने यांनी केले तर आभार प्रदर्शन रिता हनुमंते यांनी केले.