लोकदर्शन 👉 राहुल खरात
महाड ;
महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व पर्यटन संचालनालय आणि कोकण आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या शीर्षकाखाली महाड चवदार येथे एक दिवसीय शासकीय सहलीच्या आयोजन करण्यात आले. 20 मार्च 1927 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांसाठी खुले करण्यात यावे यासाठी येथे पाण्याचा सत्याग्रह करून हा तलाव तमाम अस्पृश्य जनतेसाठी खुला करून दिला. प्रसंगी अनेक संकटांचा सामना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायान समवेत हा लढा देऊन हा सत्याग्रह केला होता. याच इतिहासाची पुन्हा एकदा सर्वांना आठवण करून देण्यात यावी व डॉ बाबासाहेबांच्या या सर्वांगीण कार्याचा जनमानसात प्रचार प्रसार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा जनहिता चा उपक्रम राबवला आणि याच्या जोडीने महाडला जाताना जी ऐतिहासिक गांधारपाले बौद्ध लेणी सुद्धा आहे या लेणीची सुद्धा नागरिकांना सफर करून देण्यात आली. 26 नोव्हेंबर संविधान गौरव दिनापासून सुरुवात झालेल्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्किट टूर या संकल्पनेची जनतेमध्ये चर्चा व उत्सुकता वाढलेली आहे. या उपक्रमांतर्गत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती समाजसेवक उद्योजक शासकीय प्रशासकीय आजी-माजी अधिकारी व शालेय विद्यार्थी यांनी यात भाग घेतला प्रसंगी उच्च विद्या विभूषित हवी मुंबईतील प्रसिद्ध दंतशिक्षक डेंटल असोसिएशनचे सल्लागार डॉक्टर सुदर्शन रणपिसे , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक यादव, झेन फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब जाधव , उद्योजक गौतम अहिरे सुनिता अहिरे, एमटीएनएलचे अधिकारी संजय साळे , मुंबईचे माजी तहसीलदार आयु तांबे व अनेक महिला व पुरुषांनी या सहलीत भाग घेतला व त्याचप्रमाणे डॉक्टर सुदर्शन यांनी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आणि दादासाहेब जाधव यांनी सहलीचा दर्जा सुधारण्याबाबत सूचना मांडल्या.