लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
अंबुजा सिमेंट फाउंडेशन उपरवाही आजीविका प्रकल्प अंतर्गत कुक्कुट पालन युनिट चे वितरण 8 डिसेंबर ला थूटरा इथे साफल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनी च्या महिला सदस्यांना नवनिर्वाचित उपसरपंच सौ.कल्पनाताई भिवापुरे तसेच अंबुजा फाउंडेशनच्या अश्विनी विश्रोजवार ,ज्योतीताई जुनघरे तसेच साफल्य महिला प्रोडूसर कंपनीच्या संचालक ताई केलवतकर ,मंगला चांदेकर तसेच गावातील इतर मंडळीच्या उपस्थितीत करण्यात आले, कुक्कुट पालनच्या माध्यमातून कुक्कुट पालन हे शेतीस पूरक म्हणून उपजिविकेचे साधन आहे. यामध्ये मांसासोबत अंड्याचेसुद्धा उत्पादन होते. उपजिवेकेला आर्थिक मदत होते,