गडचांदूर शहरात दत्त जयंती उत्साहात साजरी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, पालखी व कलश यात्रा ने शहर दुमदुमले

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गांधी चौकात असलेल्या दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव 7 डिसेंबर ला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
वरदान दुर्गा उत्सव मंडळ व दत्त मंदिर कमिटी गडचांदूर च्या वतीने दत्त जयंती उत्सव चे आयोजन करण्यात आले होते,
सकाळी 9 वाजता मंदिरापासून पालखी व कलश यात्रा काढण्यात आली,
कलश यात्रेत पुरुष, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते, ढोल ताशा च्या गजरात निघालेल्या यात्रेने व हरिनामाच्या जयघोषाने शहर दुमदुमले,शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत कलश यात्रा मंदिरात विसर्जित करण्यात आली.
मंदिरात भाविकांची दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती, सायंकाळी महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,रात्री उशिरापर्यंत हजारो भाविकांनी महाप्रसाद चा लाभ घेतला,
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी वरदान दुर्गा मंडळ व दत्त मंदिर कमिटी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *