राष्ट्रीय महामार्गावरील परसोडा फाटा येथे 10 डिसेंबर ला चक्का जाम आंदोलन

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,

मे. बिर्ला ग्रुप सिमेंट कंपनी मुकुटाबन जिल्हा यवतमाळ यांना ग्राम पंचायत परसोडा यांनी सिमेंट कंपनी ला परसोडा रायपूर कोठोडा खु गोविंदपूर व कोठोडा बु येथील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी व शासकीय जमिनी खरेदी करण्या करिता व सिमेंट कंपनी सुरू करण्या करिता ग्राम पंचायत परसोडा यांनी शर्थी व अटी ला अधीन राहून ग्राम पंचायत परसोडा यांनी एकरी 25 लक्ष रुपये ,एका सात बाऱ्यावर एक कंपनी मध्ये नौकरी बाधित क्षेत्रात मूलभूत सुविधा सरसकट सर्व शेतकत्यांच्या जमिनी खरेदी करण्यात याव्या तसेच वर्ग 2 च्या जमिनी सुद्धा एकरी 25 लक्ष रुपये दरा प्रमाणे खरेदी करण्यात यावी, थेट शेतकऱ्यासोबत वाटाघाटी करून जमिनी खरेदी करण्यात याव्या असे नाहरत प्रमाणपत्र देण्यात यावे अशा शर्थि व अटी ला अधीन राहून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
दोन वर्षाचा कार्यकाळ झाला परंतु अजून पर्यंत शेतकऱ्यासोबत वाटा घाटी केल्या नाही. परस्पर मध्यस्थी मार्फत जमिनी खरेदी करण्यात आल्या आहे. त्यामुळे दोन वर्षा पूर्वी ग्राम पंचायत ने नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्या मुळे सात दिवसाच्या आत वरील गावाच्या शेतकऱ्या सोबत वाटा घाटी करण्यात याव्या अन्येथा *दिनांक 10/12/2022 ला दुपारी 12 वाजता गडचांदूर आदीलाबाद महामार्गावरील मौजा परसोडा फाटा येथे चक्का जाम आंदोलन* करण्यात येईल. असे निवेदन मा तहसिलदार कोरपना यांना देण्यात आले.
निवेदन सादर करतांना कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री उत्तम पेचे ,सरपंच सौ गिरजा रामभाऊ कोहचाडे ,उपसरपंच सतीश गोंलावार सदस्य सतीश काटकर ,गणेश मडावी, जिल्हा परिषदेच्या सदस्य सौ कल्पना पेचे , सौ ज्योती सदाशिव तलांडे,सौ सुमित्रा अरुण कुंटावार , सौ रवीना मडावी , सौ सुरेखा दुर्लावार, श्री सदाशिव तलांडे ,प्रजोत पारखी, प्रशांत घोडाम ,श्री संदिप मडावी, रामभाऊ कोहाचाडे उपस्थित होते.
परसोडा ,रायपूर ,कोठोडा खू गोविंदपूर व कोठोडा बू येथील शेतकऱ्यांनी व जनतेनी *दिनांक 10/12/2022 ला दुपारी12 वाजता चक्का जाम आंदोलन* मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोरपना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम पेचे यांनी केले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *