लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतात लोकशाहीचा पाया मजबूत करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले असून आता हीच लोकशाही मजबुत करण्यासाठी प्रत्येकाने आपापले योगदान देणे आवश्यक आहे असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे परीक्षा नियंत्रक तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ अनिल चिताडे यांनी स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे आयोजित महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले,
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विठ्ठलराव थिपे,विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे ,प्राचार्या स्मिताताई चिताडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, जेष्ठ प्रा प्रफुल्ल माहुरे होते,सर्वप्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,
याप्रसंगी डॉ अनिल चिताडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या,
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा आशिष देरकर यांनी केले, याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते