नेरुळ मध्ये महापरिनिर्वाण दिवस

 

लोकदर्शन नेरूळ नवी मुंबई 👉राहुल खरात

नेरूळ नवी मुंबई – आज दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन रॅलीसाठी नेरूळ विभागातील सर्व धम्म बांधव व धम्म भगिनी नेरूळ (पू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये समता बौध्द मित्र मंडळाचे अध्यक्ष आयू. वसंत सोरे यांच्या अध्यक्षतेखाली धम्म वंदना धेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी समता बौद्ध मित्र मंडळाचे उपाध्यक्ष आयु. सूदत्त खरात सचिव आयु. प्रदीप माने तसेच समता बौद्ध मित्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य आयु. राहुल जावळे, आयु. उत्तमराव फणसे, आयु. गाडे , आयु. जाधव , आयु एल आर गायकवाड नमुंमपा शालेय मुख्याध्यापक शिक्षक मधुकर गायकवाड त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करणारे समाजसेवक आयु तेजस फणसे , महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त संस्था परिवर्तन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रतिक सर , समाजसेवक अश्विन धसके , तरुण कार्यकर्ते रुथाईन खरात, प्रदीप भोसले , यश गायकवाड आणि समता बौद्ध मित्र मंडळाचे इतर सभासद कार्यकर्ते जेष्ठ नागरिक बालक महिला व नेरूळ पश्चिम विभागातील अनेक सामाजिक संस्था मंडळ प्रशासकीय शासकीय अधिकारी नेते व शेकडो भीमसैनिकांनी उपस्थित राहून अभिवादन केले आणि आदरांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here