लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,
भोयगाव गडचांदूर पाटण जिवती या महामार्ग चे काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत, गडचांदूर पावेतो चे काम पूर्ण झाले आहे, मात्र शहरातील राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी पावेतो च्या रोड च्या एकाच बाजूचे बांधकाम झाले आहेत, मात्र दुसऱ्या बाजूचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून रखडले आहेत, एका बाजूने रोड खोदून ठेवला आहेत, सध्या एकेरी वाहतूक सुरु असल्याने बरेचदा अपघात झाले आहेत, शहरातील हा वर्दळीचा महत्वाचा रस्ता आहे, दिवस रात्र वाहतूक सुरू असते,
तेंव्हा या रखडलेल्या सिमेंट रोड चे काम तात्काळ सुरू करण्याबाबत चे निवेदन आमदार सुभाष धोटे यांनी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर यांना प्रत्यक्ष भेटून दिले,8 दिवसात काम सुरु न केल्यास जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे,
सदर सिमेंट रोड चे काम त्वरित सुरु करण्यात येईल असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत,