लोकदर्शन 👉 प्रतीनिधी
नांदा ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी खरेदी केलेली जमीन 1500 चौरस फूट असताना बांधकाम जवळपास 2750 चौरस फूट आहे लेआउट टाकताना शेतमालकाने नऊ मीटरचा सर्विस रोड सोडलेला होता उपसरपंच या पदावर असताना पदाचा दुरुपयोग करून पुरुषोत्तम आस्वले यांनी नऊ मीटर सर्विस रोडवर अतिक्रमण करून वाणिज्य वापराकरिता दुकानाचे गाळ्यांचे बांधकाम केल्याचे चौकशीत सिद्ध झाले असून प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जात नसल्याची धक्कादायक बाब समोर आहे अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी यांच्या पत्राला तहसीलदार कोरपणा व गटविकास अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांचेकडून वारंवार कचऱ्याची टोपली दाखवली जात असल्याने जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहेत
सविस्तर वृत्त असे की, नांदा ग्रामपंचायतचे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार मोहम्मद हारुण सिद्दिकी यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली होती गटविकास अधिकारी व तहसीलदार कोरपना यांनी केलेल्या चौकशीत खरेदी केलेली जागा 1500 चौरस फूट असताना जवळपास 2750 चौरस फूट जागेवर बांधकाम केल्याचे आढळून आले आहे लेआऊट टाकताना शेतमालकाने आवरपुर गडचांदुर राज्य मार्गाला समांतर नऊ मीटर सर्विस रोड सोडला आहेत याच सार्वजनिक रस्त्यावर उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांनी अतिक्रमण करून व्यावसायिक गाळे बांधले आहे ग्रामपंचायतचे पदाधिकारी अतिक्रमण करत असतील तर गावातील अतिक्रमण कसे काय हटविणार असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे तहसीलदार व गटविकास अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लक्ष देऊन उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांचे अतिक्रमण काढण्याची मागणी मो. हारुण सिद्दिकी यांनी केली आहे
ग्रामपंचायतीना कायद्याचा विसर
घर बांधकाम करताना शासन परवानगी घेऊन स्वतःचे जागेवर बांधकाम केले पाहिजे जर कोणी अतिक्रमण करून बांधकाम करीत असतील तर नियमानुसार ग्रामपंचायतीने स्वतःहुन मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 52 व 53 अन्वये कारवाई करणे गरजेचे आहे परंतु मतांच्या राजकारणामुळे ग्रामपंचायतीचे पदाधिकारी कारवाई करणे टाळते ग्रामपंचायतकडे तक्रार केल्यावरही कारवाई केली जात नाही ग्रामपंचायतींना कायद्याचा विसर पडला आहे
पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण
ज्यांच्यावर अतिक्रमण रोखण्याची जबाबदारी आहे तेच पदाधिकारी अतिक्रमण करून व्यवसायिक गाळे बांधून कमाई करत आहे उपसरपंच पुरुषोत्तम आस्वलेने पदाचा दुरुपयोग करून अतिक्रमण केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यावरही प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आली नाहीत प्रशासनाच्या उदासीतेमुळेच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे
मो. हारून सिद्दीकी
तक्रारकर्ता