लोकदर्शन 👉.मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गुरुकुल कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे 1 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे ,शासकीय रुग्णालय कोरपणा येथील समुपदेशक श्री. संजय जीवतोडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ.प्रशांत पुराणिक, डॉ. राजेश डोंगरे, दिपाली वाढई मॅडम, श्री. रवींद्र भगत यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात डॉ. अनिल मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी एड्स सारख्या गंभीर रोगाबद्दल माहिती देण्यासाठी लोकांपर्यंत पोहोचण्याची आज नितांत गरज आहे आणि यासाठी राष्ट्रीय सेवा योजना हे एक अत्यंत चांगले माध्यम आहे असे मत मांडले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक तर आभार प्रदर्शन प्रा. सचिन करनेवार यांनी केले. उपरोक्त कार्यक्रमानंतर एड्स दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. डॉ. अनिल मुसळे यांनी रॅलीचे उद्घाटन केले. सदर रॅलीत विद्यार्थ्यांनी जनजागृती करणाऱ्या विविध घोषणा दिल्या. ही रॅली नांदा फाटा, रामनगर पोलीस मुख्यालय , दूध डेरी रोड इत्यादी ठिकाणी जाऊन शेवटी महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या अनेक स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुरुकुल महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.