मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या पदावर अमोल वंजारे यांची सर्वानुमते नियुक्ती. .!*

 

लोकदर्शन मुंबई (लालबाग,परळ👉 महेश्वर तेटांबे)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना अध्यक्ष श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते व आमदार श्री.सचिन भाऊ अहिर, उपनेत्या मीनाताई कांबळी व पश्चिम महाराष्ट्र समन्वयक, मा.आमदार श्री.दगडू दादा सकपाळ यांच्या शुभहस्ते तसेच शिव आरोग्य सेना महाराष्ट्र अध्यक्षा सौ.शुभा राऊळ मॅडम, कार्याध्यक्ष डॉ.श्री.किशोर ठाणेकर व महाराष्ट्र समन्वयक श्री.जितेन्द्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या सूचनेनुसार निष्ठावंत शिवसैनिक श्री.अमोल वंजारे यांची रुग्णसेवेसाठीचे योगदान व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेच्या मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक ह्या अत्यंत महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here