लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि १ डिसेंबर 2022
मागील दीड वर्षापासून खोपटे पूल ते JNPT (Costu Highway NH-३४८) पर्यंत रस्त्याची अवस्था ही एकदम निकृष्ट झाली होती . संबंधित रस्ता हा सिडको रोडच्या अंतर्गत येतो . ह्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक चालू असते. तसेच ह्या रस्त्यावरून उरण पूर्व विभागातील कामगार वर्ग किंवा इतर लोकही मुंबई, नवी मुंबई ला ह्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. ह्या रस्त्याची अवस्था वाईट असल्याकारणाने येथे अनेक लहान मोठे अपघात घडलेले आहेत . पावसाळ्यात तर ह्या रस्त्याची अवस्था बिकट झाली होती.खोपटे पूल ते जेएनपीटी हायवे पर्यंत असलेल्या कोस्टल रोड वर खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्ता खराब झाला होता. तो लवकरात लवकर खड्डे बुजवून नव्याने तयार करण्यात यावा ह्या साठी गोरख ठाकूर आणि उरण पूर्व विभाग मित्र परिवार ह्यांच्या कडून सातत्याने मे २०२२ पासून पाठपुरावा चालू होता. आणि त्या संदर्भात सिडको कडून तातडीने खड्डे बुजवून रस्ता नीट करण्याची निविदा २७ सप्टेंबर २०२२ रोजी काढण्यात आली होती. निविदा निघाल्या पासून सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर व उरण पूर्व विभाग मित्र परिवाराच्या माध्यमातून सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा सुरूच होता. सतत केलेल्या पाठपुराव्या मुळे ह्या रस्त्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. जनतेच्या सेवेसाठी लवकरच सुसज्ज असा रस्ता तयार होणार आहे. त्यामुळे जनतेनी सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर व उरण पूर्व विभाग मित्र परिवाराचे आभार मानले आहेत.