लोकदर्शन उरण👉 विठ्ठल ममताबादे
उरण दि 30 डिसेंबर 2022 उरण तालुक्यात 18 ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबर 2022 रोजी निवडणूका असून 20 डिसेंबर रोजी 2022 या मतदानाचा निकाल आहे. उरण तालुक्याती 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच,सदस्यांनी आपापले फॉर्म भरायला सुरवात केली आहे.दिनांक 2/12/2022 रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.डोंगरी , घारापुरी, सारडे, नविन शेवा, कळंबुसरे, बोकडविरा, पाणजे, रानसई पुनाडे , पागोटे,जसखार , चिर्ले,धुतुम,करळ , वशेणी, पिरकोन, भेंडखळ, नवघर या 18 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार आहेत , उरण तालुक्यातील या 18 ग्रामपंचायत निवडणूका मध्ये शिवसेना कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष या पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही ग्रामपंचायत निवडणूक लढविणार आहेत. भाजप अनेक ठिकाणी स्व बळावर तर काही ठिकाणी युती करून लढत आहे.तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष हे पिरकोन ग्रामपंचायत वगळून इतर ठिकाणी स्व बळावर लढणार आहे.तर समर्थ परिवर्तन पॅनेलचे प्रमुख अतूल भगत हे समर्थ परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून या ग्रामपंचायतच्या निवडणूका लढविणार आहेत . पक्ष वेगवेगळे असले तरी काहीजण एकत्र येऊन तर काही जण स्वतंत्र लढत आहेत. अनेक पक्षांची एकमेकांशी हातमिळवणी सुरु आहे. पक्षाशी युती करून निवडणूक लढविण्याच्या सुद्धा सुद्धा हालचाली सुरु आहेत . काही पक्षांनी स्व बळाचा नारा दिला असला तरी त्या त्या ग्रामपंचायतच्या परिस्थिती नुसार इतर पक्षासोबत राजकीय घडामोडी बघून कधीही यूती केली जाऊ शकते. भारतीय जनता पार्टीचा उरण विधानसभा मतदार संघात बोलबाला असून या मतदार संघात आ.महेश बालदि विद्यमान आमदार म्हणून कार्यरत आहेत. ते भाजपाचे कट्टटर पदाधिकारी व विद्यमान आमदार आहेत. याचा फायदा उरणमधील 18 ग्रामपंचायतच्या निवडणूकीत होणार आहे. भाजपाने उरण तालुक्यात स्वबळाचा नारा दिला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा ला स्पष्ट बहुमत मिळून जास्तीत जास्त ग्राम पंचायतीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकणार असल्याचे काही राजकीय तज्ञाचे मत आहे. जिथे जिथे भाजपाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही अशा ठिकाणी भाजप नवनविन पर्याय शोधत आहे. एखादया ग्रामपंचायतीत इतर पक्षासोबत भाजप हात मिळवणी करू शकतो. 2 कींवा 3 ग्रामपंचायती मध्ये इतर पक्षाशी हात मिळवणी करून निवडणूक लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. उरण तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी 12 ग्राम पंचायत मध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. भाजपचे नेटवर्क शहरापासून ते ग्रामीण भागा पर्यंत उत्तम असल्याने ही निवडणूक भाजपाला तितकीशी अवघड नाही. योग्य व्यूवरचना व जनसंपर्क यामूळे या निवडणूकीत भाजपाला आपली सत्ता खेचून आणण्यात यश मिळू शकते. कळंबुसरे, बोकडविरा, पाणजे , पागोटे , धुतुम,करळ, पिरकोन, नवघर, रानसई, पुनाडे,चिर्ले , सारडे या ग्रामपंचायती मध्ये भाजपा बहुमताने निवडून येण्याची दाट शक्यता आहे. वरील 12 ग्रामपंचायत मध्ये भाजपला या अगोदरच्या ग्रामपंचायत निवडणूकीत चांगली मते मिळाली आहेत विविध विकासकामे,व्यक्तीगत कामे व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या जोरावर सदर 12 ग्रामपंचायती मध्ये भाजप बहुमताने निवडून येण्याची दाट शक्यता आहे.