,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर 👉/प्रा अशोक डोईफोडे/
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई च्या वतीने तालुका स्तरीय तंत्र प्रदर्शनी चे आयोजन अंबुजा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, उपरवाही गडचांदूर येथे 29 नोव्हेंबर ला करण्यात आले होते,
या प्रदर्शनीमध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोरपना, अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर, पंडित जवाहरलाल नेहरू कनिष्ठ महाविद्यालय, आवारपुर येथील विद्यार्थ्यांनी प्रतिकृती सादर करून सहभाग घेतला,आधुनिक काळात उपयोगात येणारे व मानवी श्रम कमी करून ऊर्जा बचत करणारे नाविन्यपूर्ण मॉडेल विद्यार्थ्यांनी सादर केले, मूल्यमापन समिती ने उत्कृष्ट प्रतिकृती ची निवड करून जिल्हा स्तरावर पाठविले आहेत
तालुका स्तरीय प्रदर्शनीत प्रथम क्रमांक अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, गडचांदूर चा विद्यार्थी आदित्य तिवाडे व शुभम ताजने यांनी तयार केलेल्या पोर्टेबल स्प्रे पेंटिंग मशीन या प्रतिकृती ला मिळाला
द्वितीय क्रमांक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, कोरपना चा विद्यार्थी मंगेश हिवरे व राकेश माणुसमारे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बेअरिंग पुलर या प्रतिकृती ला मिळाला,तर तृतीय क्रमांक अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, चा विद्यार्थी भागेश चिकटे व रोशन बोरकुटे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वॉटर लेव्हल इंडिकेटर या मॉडेल ला मिळाला,
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सचिन देशमुख, प्रकाश वडणेरकर, अरविंद वैरागडे,प्रा,विजय मुप्पीडवार,प्रा रोशन मेश्राम, आयोजक प्राचार्य प्रमोद खडसे,होते,
संचालन व आभार प्रदर्शन प्रफुल्ल बोरकुटे यांनी केले,
प्रदर्शनीच्य सफलतेसाठी संदीप तोडे,नरेश सुभे,रवी मडावी, आदींनी परिश्रम घेतले,