लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि ३० नोव्हेंबर 2022उरण तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून या निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक जण दिवसाचा रात्रं व रात्रीचा दिवस करून मेहनत घेत आहे. उरण तालुक्यात एकूण १८ ग्रामपंचायतच्या निवडणुका असून या १८ ग्रामपंचायतच्या निवडणुका मध्ये पिरकोन , भेंडखळ , पागोटे , सारडे , जसखार , नवीन शेवा या ग्रामपंचायती मध्ये स्व बळावर लढत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत एकला चलोरेची भूमिका घेतलेली आहे. पिरकोन ग्रामपंचायत वगळता इतर सर्व ग्रामपंचायत मध्ये मनसे स्वबळावर लढणार आहे.एकला चलोरेची भूमिका स्वीकारून मनसेने पदाधिकारी कार्यकर्त्यांना एकला चलोरेचा संदेश दिला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.
सध्याच्या ग्रामपंचायत निवडणुकीत मनसेचे जास्तीत जास्त सरपंच, ग्रामपंचायत सदस्य बहुमताने निवडून येतील असे मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकाच्या बाबतीत मनसेच्या जास्तीत जागा निवडून याव्यात यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.