लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा येथे संयुक्त शिक्षक मेळावा आणि सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार सोहळा.
राजुरा (ता.प्र) :– महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राजुरा, जिवती आणि कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य शिक्षक मेळावा सानेगुरुजी सभागृह राजुरा येथे घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक प्रभाकर मोरे, उमदास खोब्रागडे, साईबाबा इंदूरवार, मधुसूदन रेड्डी, प्रकाश चौधरी आदींचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आ. धोटे म्हणाले की, शिक्षक हे राष्ट्र निर्माते आहेत. संस्कारक्षम विद्यार्थ्यांची पिढी घडविण्याचे काम आपल्या माध्यमातून पार पडते. तेव्हा शिक्षकांवर अधिक मोठी जबाबदारी असते. या जबाबदारीला आजच्या अस्वस्थ आणि गुंतागुंतीच्या काळात न्याय देण्याचे काम शिक्षकांना करावे लागते आहे. शिक्षक मेळाव्याचे माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील बदल, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न अशा विविध बाबींसह शिक्षण क्षेत्राला उज्वल करण्यासाठी मंथन व्हावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमांचे अध्यक्ष मधुकरराव मुप्पीडवार, प्रमुख मार्गदर्शक शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य महिला प्रमुख पूजाताई चौधरी, नागपुर विभाग प्रमुख सुभाष गोडमागे, प्रमुख अतिथी राज्य कार्याध्यक्ष प्रकाश चूनारकर, जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गोरकर, जिल्हा कार्यवाह रामदास गिरटकर, अमोल देठे, संजय लांडे, तालुका अध्यक्ष अविनाश पिंपळशेंडे, किशोर मुन, दिलीपकुमार राठोड, विकास तुराने, दयानंद चिंतलवार, किरण लांडे, नरेंद्र चौखे, विजय भोयर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.