नांदा येथे तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️तालुक्यातील 16 संघ सहभागी ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ♦️होली फॅमिली पब्लिक स्कूल गटामध्ये विजेता

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर व कोरपणा तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने शालेय व्हॉलीबॉल चे सामने नांदा येथील श्री प्रभू रामचंद्र विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या ,यामध्ये 14 वर्षाखालील 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील सामने खेळवल्या गेले तालुक्यातून महात्मा गांधी विद्यालय गडचांदूर ,अंबुजा निकेतन ऊपरवाही, आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल गडचांदूर ,आवारपुर ,सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर ,जवाहरलाल नेहरू विद्यालय आवाळपूर,श्री प्रभू रामचंद्र विद्यालय नांदा, माउंट पब्लिक स्कूल नांदा फाटा ,होली फॅमिली पब्लिक स्कूल गडचांदूर अशा विविध शाळांनी सहभाग नोंदवला ,स्पर्धेच्या उद्घाटनिय सोहळाकरिता नांदा गावच्या नवनियुक्त सरपंच मेघा नरेश पेंदोर उद्घाटक म्हणून यजमान प्रभू रामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल मुसळे, कोरपणा तालुक्यातील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर माकोडे ,गुरुकुल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर राजेश डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते सामन्यांच्या दरम्यान 14 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये फॅमिली पब्लिक स्कूल गडचांदूर यांनी बाजी मारली तर मुलींच्या गटामध्ये आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपुर यांनी आपले स्थान कायम ठेवले 19 वर्षाखालील मुलांच्या गटात अंबुजा विद्यानिकेतन उपरवाही यांनी जिल्ह्यावर जाण्याचा मान मिळवला तर मुलींच्या गटामध्ये आदित्य बिर्ला पब्लिक स्कूल आवारपुर यांनी आपले स्थान कायम ठेवले 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये होली फॅमिली पब्लिक स्कूल गटचांदूर यांनी अजिंक्य पद मिळवले तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटामध्ये सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर यांनी अजिंक्यपद मिळवले स्पर्धेच्या यशस्वी ते करिता तालुक्यातील शारीरिक शिक्षक ज्ञानेश्वर माकोडे, रमेश वासेकर, निलेश बोडे, होली फॅमिली येथील येथील शारीरिक शिक्षक चौधरी ,जुही शेख महात्मा गांधी विद्यालय येथील प्राध्यापक प्रशांत पवार,बबन भोयर, भूपेश काळे किरण ती मोती यांनी परिश्रम घेतले पंच म्हणून योगेश मुळे राहुल पाचवा, रवींद्र चिंचोलकर, रोशन खोके, योगेश अंभोरे, साहिल पाचभाई ,यांनी सहकार्य केले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *