,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 प्रा अशोक डोईफोडे/
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
कोरपना तालुक्यातील परसोडा येथे सन 1959,60 व 1961 ह्या तीन वर्षांत पैनगंगा नदीला महापूर आला होता तेव्हा नदी काठावर वसलेले कुटुंबाचे सर्वे नंबर 151 वर पुनर्वसन करण्यात आले. पहिले कच्चा घरांचे बांधकाम करण्यात आले आता त्या जागेवर पक्या घराचे बांधकाम करण्यात आले असून सर्व शेतकरी शेतमजूर आहे. या जागेच्या व्यतिरिक्त त्यांच्या कडे कोणतेही घर नाही व जागाही नाही. 50 ते 60 वर्षा पासून वास्तव्यास आहे.
जिथे मानव वस्ती आहे त्या ठिकाणी शासकीय बालवाडी इमारत ,ग्राम पंचायत भवन, सिमेंट काँक्रिट रस्ते, सिमेंट काँक्रिट नाली चे बांधकाम करण्यात आले आहे. गावामध्ये विद्युती करणं करण्यात आले असून पिण्याच्या पाण्याच्या सोयी करण्यात आलेल्या आहे.तसेच ग्राम पंचायत रेकॉर्ड ला 100 पेक्षा जास्त कुटुंबाची नोंद घेण्यात आलेली आहे.तेव्हा गावकऱ्यांची मागणी आहे की, आम्ही ज्या जागेवर 50 ,60 वर्षा पासून वास्तव्यास आहे, त्या घराचे स्थायी पट्टे कायम करण्यात यावे, अशी मागणी
मा. तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत मा .जिल्हाधिकारी चंद्रपूर,
मा. बाळू भाऊ धानोरकर खासदार साहेब व मा सुभाष भाऊ धोटे साहेब आमदार यांना निवेदन पाठविण्यात आले.
निवेदन देतांना तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उत्तम पेचे,सरपंच गिरीजा कोहचाडे,उपसरपंच सतिश गोलावार,तंटामुक्ती चे अध्यक्ष नेमीचंद काटकर, ग्राम पंचायत सदस्य सतिश काटकर,गणेश मडावी,सौ रविना मडावी,सौ ज्योती तलांडे,सौ पदमा सिडाम,सौ सुमित्रा कुंटावार,सौ सुरेखा दुरलावार,आदी उपस्थित होते.