लोकदर्शन 👉 मोहन भारती
कोरपना :– कोरपना तालुक्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांचे सत्कार कोरपना येथील श्रीकृष्णा हॉल येथे एका दिमाखदार सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे, उद्घाटक लोकप्रिय खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या शुभ हस्ते शाल, काँगेस पक्षांचे दुप्पटा देऊन करण्यात आले.
या प्रसंगी आ. सुभाष धोटे म्हणाले की, कोरपना तालुक्यातील थेट जनतेतून निवडून आलेल्या काँग्रेस पक्षाच्या १३ सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आणि यशस्वी झाले. आता सर्वांनी गावातील विकासासाठी अथक परिश्रम घेतले पाहिजे. निवडणुकीत पराजय झालेल्यांनी अजिबात खचून जाऊ नये त्यांनी जनसेवेत अधिक वाहून घ्यावे. जेथे जेथे आमच्या सहकार्याची गरज असेल आपण सर्वतोपरी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तर खासदार बाळुभाऊ धानोरकर म्हणाले की, ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू गाव आहे. गावातील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांचेवर विशेष जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्रित येऊन गावाच्या प्रगतीला पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे. काही अडचणी आल्यास आम्हाला सांगा आम्ही निश्चितपणे त्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार. आपल्याला विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.
या प्रसंगी जेष्ठ नेते तथा कृ.उ.बा.स सभापती श्रीधरराव गोडे, तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर तथा नगरसेवक विजयराव बावणे, जेष्ठ नेते दिनकर पाटील मालेकर, नगराध्यक्षा सौ नंदाताई बावणे, माजी जि.प.सभापती झिबल पा जुमनाके, माजी सभापती प.स. श्याम रणदिवे, भाऊराव पा कारेकर, माजी उपसभापती संभाजी कोवे, माजी जि. प. सदस्य सिताराम कोडापे, सुरेश पा मालेकर, भाऊजी चव्हाण, उपनगराध्यक्ष इस्माईल शेख, यु. काँ. तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, नगरसेवक नितीन बावणे, प्रशांत लोढे, निसार शेख, मनोहर चन्ने, लखन पंदरे, देविकाताई पंदरे, जोशनाताई खोबरकर, राधिकाताई मडावी, मनीषा लोढे, अरीफा शेख, प्रा. आशिष दरेकर, सं गां नि योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, राजाभाऊ गलगट, रसूल पटेल, अनिल गोडे यासह तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन गणेश गोडे यांनी केले. प्रास्ताविक विजयराव बावणे यांनी तर आभार प्रदर्शन शैलेश लोखंडे यांनी मानले.