वसंतरावं नाईक विद्यालय येथे संविधान दिन साजरा.

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना. तालुका विधी सेवा समिती कोरपना आणि वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्त प्रभात फेरी ही कोरपना शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला दिवाणी व फौजदारी न्यायालय कोरपना चे न्यायाधीश आर आर थोरात, ए जे पाटील , गटशिक्षणाधिकारी कांबळी , केंद्रप्रमुख चीडे, वसंतराव नाईक विद्यालय चे प्राचार्य डी जी खडसे , अड श्रीनिवास मुसळे, ॲड. पवन मोहितकर, गणेश गोडे, विलास भोयर , बावणे साधु. आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थितानी संविधान दिन बद्दल माहिती दिली. तसेच आपले न्याय व हक्क याबाबत मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी कांबळी यांनी आपल्या मार्गदर्शनात संविधान हा एकत्रीकरणाचा दुवा असल्याचे सांगितले.याद्वारेच सर्वांना समान हक्क प्रस्थापित होत असल्याचे मत त्यांनी मांडले. न्यायाधीश थोरात व पाटील यांनी ही मूलभूत अधिकाची जाणीव ठेवली तर प्रत्येकाला आपले न्याय हक्क कसे मिळतील याबाबत संबोधित केले. प्राचार्य खडसे यांनी दिनाविषयी संपूर्ण विस्तृत पणे माहिती दिली. वसंतराव नाईक विद्यालया तर्फे संविधान भेट देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोडे संचालन बोंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक एम बी धकाते, टिकले , आधावं, शंकर लसते, उलमाले व वसंतराव नाईक विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here