लोकदर्शन 👉मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
या देशातील दिन,दलित,शोषित ,वंचित,आदिवासीमहिलांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य बहाल करून भारतीय संविधानाने त्यांच्यात स्वाभिमान निर्माण केला. संविधान मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे. 26नोव्हेंबर1949रोजी संविधान राष्ट्राला अर्पण करण्यात आले. या दिनाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथे संविधान सन्मान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डी आर काळे सर होते .त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संविधानाचे महत्व पटवून देत संविधान निर्मितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान व प्रत्येकाने संविधान समजून घेतले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक प्रमुख तथा कला विभाग प्रमुख प्रा प्रशांत खैरे उपस्थित होते त्यांनी भारतीय संविधान हे कसे विश्वश्रेष्ठ संविधान आहे हे सांगत वर्तमान काळात हे संविधान अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्रा सोज्वल ताकसांडे (विज्ञान विभाग प्रमुख )प्रा. डी यु पोळे पोडे सर उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात संविधानाची उद्देश पत्रिका वाचून करण्यात आली .आणि सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.गायन स्पर्धेचे परीक्षण सुरेश पाटील सर व फ्रान्सिस मॅडम यांनी केले.स्पर्धेमध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अतिशय सुंदर असे देशभक्तीपर आणि संविधानावर तसेच महापुरुषांवर आधारित एकापेक्षा एक सरस गीत सादर केले.या स्पर्धेत प्रथम क्रमांक कु वैष्णवी मेश्राम, वैष्णवी नागोसे, सारिका गेडाम यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक कु स्नेहा कोटनाके, काव्यांजली हलबले, अदिती कुलसंगे यांना मिळाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा नितीन सुरपाम यांनी केले तर आभार प्रा प्रवीण डफाडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा अशोक सातारकर, प्रा जहिर सय्यद, प्रा दिनकर झाडे, प्रा दिलीप गुजर, प्रा भगत यांनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी प्रेमचंद आदोळे व रामदास वाढई तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
,