लोकदर्शन उरण 👉विठ्ठल ममताबादे
उरण दि 28 नोव्हेंबर2022 रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा पाटील ज्युनिअर कॉलेज जासई, तालुका उरण जिल्हा रायगड या विद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी सोमवार दिनांक 28/ 11/ 2022 रोजी मोठ्या भक्ती भाव वातावरणामध्ये साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या त्यागमय जीवनाची माहिती सांगून शिक्षणासाठी व समाज उद्दरासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या म. ज्योतिबा फुले यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्यवर यशवंत घरत, रघुनाथ ठाकूर ,निलेश म्हात्रे,यतीन म्हात्रे,मधुकर पाटील यांच्या शुभहस्ते विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या थोर समाजसुधारकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस. एस तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नुरा शेख तसेच विद्यालयातील सर्व सेवक वर्ग, विद्यार्थी ,शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. हा कार्यक्रम इयत्ता सातवी क या वर्गाकडून आयोजित करण्यात आला होता, सातवी क या वर्गाच्या वर्गशिक्षिका पुनम मुंगाजी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून ओळख करून दिली.विद्यार्थी मनोगतात कु.संजना पासवान, कु.कोमल मंजुळकर, कु.कावेरी धुळे,गणेश जाधव,गणेश धुमाळ यांनी म.जोतिबा फुले यांच्या जीवनावर भाषणे केली. शेवटी घरत पी.जे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.