लोकदर्शन👉 राहुल खरात
म्हसवड ; ज्या दिवशी भारतीय
संविधान तुम्ही वाचाल त्या दिवशी तुम्हाला डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कळणार आहेत बाबासाहेबांनी तुमच्या साठी जे केले आहे ते जरा आठवून पहा मग कळेल या महामानवाने काय दिले आसेल तर संविधानच्या माध्यमातून सर्व काही दिले संविधानच्या पहिल्या पानावरील प्रस्तावने मध्ये सर्व संविधानचा सारांश लिहिला आहे त्याचे पहिले वाचन आजच्या तरुणांनी करणे गरजेचे असल्याचे मुंबई सेवा संघाचे कार्याध्यक्ष भास्कर सरतापे यांनी व्यक्त केले
येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे भास्कर सरतापे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संविधान गौरव दिन साजरा करण्यात आला या वेळी माण तालुका भारतीय बौद्ध महासभेचे खजिनदार व बौद्धाचार्य कुमार सरतापे, पत्रकार एल के सरतापे, सिध्दार्थ सरतापे, दिनकर बनसोडे शशिकांत सरतापे, केशव सरतापे, योगेश सरतापे,श्रीधर सरतापे सह लहान मुले व मुली उपस्थित होत्या यावेळी एल के सरतापे यांचे वतीने शालेय मुलांना शालेय साहित्य वही व पाने वाटप करण्यात आले
समाज बांधवांना व शालेय मुलांना संविधाना विषय माहिती सांगताना भास्कर सरतापे म्हणाले बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानच्या माध्यमातून सर्व मानव जातीला बोलण्याचा, स्वताचे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला महिलांना बाळंतपणाच्या रजे पासून, घरावरील हक्क सांगण्याचा अधिकार दिला आज जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान ठरले आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक श्रमाने लिहलेल्या संविधाना मुळेच आज देश चालतो नव्हे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, आमदार, खासदार यांना कामकाज करणे बंधनकारक आहे संविधानाच्या कलमानुसार त्यांना काम करावे लागते बाळानो त्यासाठी घरा घरात संविधानाचे वाचन झाले पाहिजे त्या शिवाय तुम्हाला बाबासाहेबांनी उभारलेली हि लोकशाही कळणार नाही पंतप्रधान यांना जो एक मताचा अधिकार संविधानाच्या माध्यमातून दिला तोच आधिकार सामन्यातील सामन्य माणसाला ही एकाच मताचा अधिकार दिला आहे त्यासाठी बालमित्रानो संविधान वाचन करा त्याशिवाय बाबासाहेब आंबेडकर कळणार नाही असे मत भास्कर सरतापे यांनी व्यक्त केले