,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन अकोला 👉(सुभाष महाजन/ प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
महाबीज सेवा निवृत्त कर्मचारी संघटनेचे प्रथमअधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील कमिटी हॉल येथे सोमवार दि 21 नोव्हेंबर। 2022 रोजी संपन्न झाले,
अधिवेशनचे उद्घाटन महाबीज चे माजी व्यवस्थापकीय संचालक श्री विश्वासराव धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वप्रथम मान्यवरांच्या डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले संघटनेच्या वानखेडे यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले पदाधिकाऱ्यांचे हस्ते पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तद्वतच संघटनेचे वयाच्या सत्तरपेक्षा जास्त वय असलेल्या सत्तावीस सन्माननीय सभासदांचा सपत्निक मान्यवरांच्या हस्ते ,सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव श्री राजेंद्र भातुलकर यांनी केले. त्यांनी संघटनेचे माध्यमातून बंधुभाव, अडीअडचणी मधे आर्थिक, सामाजिक मदत इत्यादी तसेच व्यवस्थापन स्तरावरच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना कार्यरत असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक श्री विश्वासरावजी धुमाळ, IAS, माजी व्यवस्थापकीय संचालक, महाबीज, अकोला यांनी महाबीज व्यवस्थापणाने निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा समनव्यय साधून महाबीजच्या उत्कर्षासाठी उपयोग करुन घेणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांच्या न्यायोचित प्रलंबित मागण्या सोडवाव्यात असे प्रतिपादन केले. यावेळी महाबीज बद्दल बोलताना त्यांनी सांगितले की28/4/ 1976 महाबीज ची स्थापना झाली
प्रथमता चार जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला महाबीज चा विस्तार पुढील काळात पूर्ण महाराष्ट्रात व राज्याबाहेर झाला अत्यंत अल्प सोयी सुविधांमध्ये शेतकऱ्यांना उत्तम प्रतीचे बियाणे देण्यासाठी महाबीजचे बियाणे निर्मितीचे व विक्री व्यवस्थापनाचे कार्य कार्य चालू होते करत होते पुढील काळामध्ये महाबीज ची मागणी येऊ लागली व शेतकऱ्यांचा बियाण्यावरती विश्वास बसला , महाबीज मध्ये सेवानिवृत्त झालेलेअधिकारी कर्मचारी मोठ्या उत्साहाने रात्रंदिवस काम करत होते त्यांनी महाबीजला परिवार मानले होते तिकडे दुर्लक्ष करून त्यांनी माफीच्या कामाला प्रथम प्राधान्य दिले परंतु एक आनंदाची गोष्ट अशी त्यांनी मुलांना चांगले शिक्षण देऊन संस्कार दिले व आज बहुसंख्य कर्मचाऱ्यांची पाल्य हे राज्यात व परदेशात चांगल्या पदावर काम करत आहे आजही समाजामध्ये त्यांना मानाचे स्थान मिळत असून त्यांचे सुदृढ आरोग्य हीच त्यांच्या कामाची पावती आहे
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाबीजचे संचालक कृषी कुटुंबातील, मातीशी नाळ असलेले शल्य चिकित्सक डॉ रणजितजी सपकाळ साहेब यांनी प्रतिपादित केले की महाबीजने शिस्तबद्ध रित्या आराखडा तयार करून शेतकऱ्यांना नवनवीन वाण पुरवून शेतकऱ्यांचा व महाबीजच्या उत्कर्षासाठी कटिबद्ध असले पाहिजे व कर्मचाऱ्यांच्या समस्यांच निवारण केलं पाहिजे.
प्रमुख पाहुणे श्री रामचंद्रजी नाके, माजी महाव्यवस्थापक (विपणन) यांनी व्यापारीक संस्थेमधे कुठलेही कार्य उत्कृष्ठपने करुन घेण्यासाठी कर्मचारी हा महत्त्वाचा दुवा असतो व त्याला यथायोग्य उपदान दिले तर तो उत्कृष्टपणे कार्य पार पाडू शकतो असे प्रतिपादन केले.
सत्कारमूर्ती श्री केशवरावजी देशमुख,संघटनेचे अध्यक्ष, श्री रमेशजी मेटकर, श्री ताटर यांनी यथोचित मनोगत व्यक्त केले. व महाबीजच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला विश्वासराव धुमाळ साहेब यांच्या प्रशासन व कर्मचाऱ्यांबद्दल असलेल्या आपुलकी बाबत त्यांचे कौतुक केले
ग्रामगीताचार्या श्री रामरावजी पाटेखेडे यांनी प्रसंगानुरूप संघटनेचे सचिव ज्यांचा हा कार्यक्रम आयोजित व संपन्न करण्यामागे सिन्हाचा वाटा आहे ते संघटनेचे सचिव श्री राजेंद्रजी भातुलकर यांचा सपत्निक शाल श्रीफळ, ग्रामगीता देऊन गौरविण्यात आले,
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुरेशजी पुंडकर, महाबीज माजी, महाव्यवस्थापक (उत्पादन ) यांनी सर्व बाबींचा उहापोह करुन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याचा निपटारा व्यवस्थापन स्तरावर करण्यात यावा असे नमूद केले त्यांनी सांगितले की महाबीजचा कर्मचारी हा अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक असून. त्यांचे कष्टाचे चीज म्हणून प्रलंबित मागण्यावर विचार व्हावा
या कार्यक्रमात श्री एस आर महाजन सेवानिवृत्त कृषी क्षेत्र अधिकारी यांना कृषी भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माननीय श्री धुमाळ साहेब माजी व्यवस्थापकीय संचालक यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या सन्मान व गौरव करण्यात आला
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संघटनेचे कार्याध्यक्ष श्री गजानन काटे यांनी केले.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन श्री ढाले सर यांनी केले.
दुपारच्या सत्रात प्रलंबीत मागण्या जसे सातवे वेतन आयोग, सुधारित पेन्शन, अश्वसीत प्रगती योजना, वेतनातील त्रुटी यावर सखोल चर्चा करून उपाययोजने बद्दल ठरविण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वीते करिता संघटनेचे उपाध्यक्ष श्री के जी देशकर, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री अरविंदजी ककड मानोरकर, दिलीपराव ब़ोबडे, प्रतापराव गीरी, सुनीलजी नीवाने, डॉ चंद्रकांत अवचार, हनुमान आगे बबनराव अवघडे विलास पल्हाडे , वसंत सिंहे, सुरेशं लांडे, गजानन उपाध्ये, वाघ, इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.