,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉-(प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
संविधानाची मूल्ये न्यायालयाने जपलीच आहे पण ती लोकांमध्ये व नागरी समाजात रुजायला हवीत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानांच्या मूल्यांचा प्रसार होणे आवश्यक आहे. भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत तर या देशातील व्यक्ती, केंद्रस्थानी मानून स्वातंत्र्य, आणि समतेची कास धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे असे प्रतिपादन शरदराव पवार महाविद्यालयात आयोजित संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठी विभाग प्रमुख डॉ.हेमचंद दूधगवळी यांनी केले आहे.
शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालय गडचांदूर येथे संविधान दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संजय गोरे, डॉ. राजेश गायधनी,डॉ. माया मसराम ,प्रा. मंगेश करंबे हे प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी प्रास्ताविकातून डॉ. संजय गोरे यांनी संविधान हे भारतीय माणसाची मार्गदर्शक गुरुकिल्ली असून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या नैतिक मूल्यांची कास धरणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले डॉ. आंबेडकरांनी तयार केलेले संविधान म्हणजे भारतीय माणसाच्या जीवनशैलीची आधारशीला आहे असे यावेळी ते म्हणाले.या प्रसंगी डॉ.माया मसराम व प्रा. मंगेश करंबे व प्रफुल्ल मानकर यांनी संविधान दिनानिमित्त आपले विचार मांडले.या कार्यक्रमाचे संचालन सनम पाचभाई हिने केले तर आभार आकाश अडबाले यांनी मानले यावेळी 26 /11 मध्ये मृत्युमुखी पडलेल्या वीरांना मानवंदना देण्यासाठी दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले. राष्ट्रगीता नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली.