लोकदर्शन 👉प्रा. गजानन राऊत
. . .. विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, अँड सायन्स, जिवती येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले. तसेच उत्तम वक्ते आणि संविधानाचे गाढे अभ्यासक डॉ. श्री अंकुश गोतावळे यांनी “भारतीय संविधानाची निर्मिती आणि वैशिष्ट्य” या विषयावर व्याख्यान दिले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली अमूल्य देणगी म्हणजे भारतीय संविधान होय असे सांगत त्यांनी संविधानाने दिलेली मूलभूत हक्क व कर्तव्य यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व तथागत गौतम बुद्ध यांच्या उद्दात्त विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटलेले आहे हे त्यांनी ठासून सांगितले. भारतीय संविधान हे समाजातील सर्व घटकांसाठी उपयुक्त असून याचे संरक्षण करण्याची जबाबदारी युवकांची आहे. तसेच संविधान हे लोकशाहीचा कणा असे प्रा राऊत यांनी सांगितले. कार्यक्रमाची प्रास्ताविक व संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी श्री. संजयकुमार देशमुख यांनी केले आणि आभार प्रदर्शन महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रीती चव्हाण यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. तेलंग सर, प्रा. लांडगे सर, गणपत मेश्राम, नीलिमा मोहितकर भास्कर पिंपळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.