लोकदर्शन वालुर 👉 महादेव गिरी
वालुर येथील श्रीमती शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.व्हि.नखाते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भगवान पले्वाड, गजानन महाले,उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरुन रँली काढून गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करून पुतळ्यास प्राचार्य आर.व्हि.नखाते यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी भगवान पले्वाड, गजानन महाले यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले .प्राचार्य आर.व्हि.नखाते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमेध आवटे यांनी केले तर आभार प्रदिप कांबळे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी उपस्थित होते.