लोकदर्शन अमरावती👉 राजू कलाने
अमरावती :- भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल होताच खा. राहुल गांधी यांच्या सोबत राज्यातील काँग्रेसचे नेते विविध संघटना यांनी यात्रेला पाठींबा दिला,प्रचंड जनसमुदाय या यात्रेत राहुल गांधी सोबत जुळत गेला,या दरम्यान त्यांच्यासोबत चालायला व चर्चा करायला कित्येक ज्येष्ठ नेत्यांना अक्षरशः पळत सुटावे लागत होते असे चित्र अनेकदा पाहायला मिळाले अशातच अमरावती येथील काँग्रेसचे अनुसूचित विभागाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष व युवक काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष सागर कलाने यांची झालेली भाऊक भेट ही चर्चेचा विषय ठरली. यात त्यांचा फोटो व चर्चेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शेगाव येथे झालेल्या खा. राहुल गांधी यांच्या सभेमध्ये ही तो दाखविण्यात आल्याने उपस्थित जनसमुदायात कमालीची लोकप्रियता त्याला मिळत आहे.
भारत जोडो यात्रा नांदेड ते शेगाव या दरम्यान कित्येकदा प्रयत्न करून ही अपयशी झालेल्या सागर कलाने यांना खुद्द राहुल गांधी यांनी दिलेली मिठी ही भावुक ठरणारी होती,त्यांनी हात लावता व मिठीत घेताच भावना अनावर होऊन आपसूकच डोळ्यातून अश्रू बाहेर यायला लागले असे सागर कलाने यांनी सांगितले
याच क्षणी आंबेडकरी चळवळीतील निळा दुपट्टा राहुल गांधींच्या गळ्यात टाकला, त्यांनीही या गोष्टीचे स्वागत करून विचारपूस केली. व चर्चेला सुरवात झाली यावेळी सागर कलाने यांनी बहुजनांवर वाढते अत्याचार,बहुजनांच्या महामानवांची शासनाकडून होणारी हेळसांड, अनुसूचित जाती व जमातीच्या नोकरीतील बॅकलॉग,वाढती बेरोजगारी, खाजगीकरण, शेतीच्या उत्पादनाला भाव मिळत नसल्याने कृषीविषयक उदासीन असलेले सरकार,वारंवार होणारा संविधानाचा अपमान,लोकशाहीची होणारी पायमल्ली अशा व विविध महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा झाल्याचे सागर कलाने यांनी सांगितले. इसलीये तो हमे सब मिलके एकजुटता दिखानी है असे त्यांनी म्हणत पाठीवर हात ठेवला यासाठी खा.राहुल गांधी यांचे कलाने यांनी आभार मानले.